mmcnews mmcnews

गॅलरी

जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने तंबाखू मुक्तीची शपथ

मुंबई, दि 30जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृहामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (वित्त) श्री. प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनाचे आज (दिनांक ३० मे २०२५) उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखूचे सेवन न करण्याची तसेच व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली.या कार्यक्रमाला प्रमुख कामगार अधिकारी श्री. सुनील जांगळे यांच्यासह नशाबंदी मंडळाचे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

शनिवारी पुण्यात ख्रिस्ती हक्क परिषदेचे आयोजन

पुणे, दि 30: रिजनल ख्रिश्चन सोसायटी यांच्या वतीने पुण्यात येत्या शनिवारी (31 मे)  ख्रिस्ती हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत (लुकस) केदारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  पुणे पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला राहुल डंबाळे, अॅड. अंतुन कदम, जॉन मंतोडे,  जुबेर मेमन, […]Read More

गॅलरी

“सीडबॉल”: पर्यावरण रक्षणाची प्रेरणादायी कहाणी !

पुणे, दि 30- वनतोड, हवामान बदल आणि जैवविविधतेच्या ऱ्हासासारख्या गंभीर समस्यांवर भाष्य करणारा ‘सीडबॉल’ या मराठी चित्रपटाचे अंतिम टप्प्यातील चित्रीकरण नुकतेच कोकणात कुंभारखाणी बुद्रुक गावी पार पडले. साज एंटरटेनमेंट निर्मित आणि क्रीपक्यू प्रेझेंट्स यांच्या संकल्पनेतून हा चित्रपट साकारला जात आहे. गावाच्या देवराईला वाचवण्यासाठी लहान मुलांनी केलेला संघर्ष या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. झाडे लावा, झाडे वाचवा […]Read More

देश विदेश

‘एमआयटी एडीटी’च्या प्रा.केदारींची पदकांची हॅट्ट्रिक!

पट्टाया (थायलंड) / पुणे, दि 30: थायलंडची राजधानी पट्टाया येथे झालेल्या आशियाई इनडोइअर रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या (एडीटी) ‘स्कुल ऑफ लाँ’चे प्राध्यापक आदित्य रविंद्र केदारी यांनी पदकांची हॅटट्रिक पूर्ण करत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. प्रा.केदारींनी २ किमी मास्टर मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण, २ किमी पुरुष मास्टर्स एकेरी स्कल […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सराटी येथील नवीन नवरीने सराटीवासीयांना नखे दाखवायला केली सुरुवात

मुंबई, दि 30नखरेसराटी येथील नव्या नवरी ने इंदापूरवाशींना नखरे दावण्यास सुरुवात केली आहे. सराटीच्या टोल चालकांची मुजोरी इतकी वाढली आहे की चक्क वाहनधारक चालकांना मारण्यास त्यांनी गावगुंड ठेवले आहेत.सराटी गावच्या हद्दीत नव्यानेच उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावर वाहन चालकाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली असून टोल नाक्यावर कर्मचारी की गावगुंड असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित केला जात […]Read More

महानगर

बनावट निविदा तयार करून वर्षांत 1000 कोटी रुपयांचा गाळउपसा घोटाळा

मुंबई, दि 30मिठी नदी गाळउपसा प्रकरणी किमान 1000 कोटी रुपयांच्यावर घोटाळा झालेला असताना सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून होणारी चौकशी ही मोठे मासे अडकलेल्या मुख्य घोटाळयाकडे दुर्लक्ष करून केवळ 3 ते 7 कोटी रुपयांच्या पारंपारिक निविदा राबविणाऱ्या छोट्या ठेकेदारांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देणारी आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मोकाट फिरत असून मुख्य तक्रारींपासून […]Read More

महाराष्ट्र

लातूर बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधील नालेसफाई पूर्ण;व्यापाऱ्यांनी मानले आभार

लातूर, दि 30नुकत्याच झालेल्या पावसामुळे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट आवारात नाल्या तुंबल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती.नाल्यांमधील कचरा आणि घाण पाणी बाहेर आल्यामुळे भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या नागरिक आणि व्यापाऱ्यांना पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.या समस्येबाबत भाजी मार्केटमधील व्यापारी श्रीकांत ठोंबरे,काशिनाथ झांबरे,अस्लम बागवान,इरफान बागवान आणि सय्यद नूर […]Read More

देश विदेश

भारतातील यस बँक जपानी सुमितोमो बँकेला विकण्याच्या व्यवहाराची न्यायालयीन चौकशी

मुंबई प्रतिनिधीजपानमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने (SMBC) अलीकडेच भारतातील खाजगी क्षेत्रातील महत्वाच्या YES बँकेत सुमारे ₹१३,००० कोटींची गुंतवणूक करून २०% हिस्सा विकत घेतला आहे. पुढील टप्प्यात ₹३०,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करून ५१% हिस्सेदारीसह YES बँकेवर संपूर्ण ताबा मिळवण्याची त्यांची योजना आहे. हा व्यवहार भारताच्या बँकिंग सार्वभौमत्वावर गदा असून या संपूर्ण व्यवहाराची […]Read More

राजकीय

केंद्र सरकारने MSP त केलेली वाढ युपीए सरकारच्या तुलनेत अत्यंत

मुंबई, दि. ३० —केंद्रातील भाजपा सरकार शेतमालाच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यावर उपकार केल्याचा अविर्भाव आणत आहे. परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काँग्रेसप्रणित डॉ. मनमोहनसिंह सरकारने २००४ ते २०१४ या १० वर्षात हमीभावात १२० ते १५० टक्के वाढ दिली तर २०१४ ते २०२४ काळात मोदी सरकारने या तुलनेत […]Read More

सांस्कृतिक

राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा

मुंबई दि ३०– गोवा राज्याच्या मूळ लोकसंस्कृतीचे संगीत व लोककलेच्या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी गोवा राज्य स्थापना दिवस (३० मे) तसेच तेलंगणा राज्य स्थापना दिवस (२ जून) संयुक्तरित्या साजरा करण्यात […]Read More