पालघर जिल्ह्यात 17 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

 पालघर जिल्ह्यात 17 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

पालघर, दि. २८ : पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून 17 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 17 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जादा दराने विक्री, साठेबाजी, खतासोबत इतर साहित्य खरेदीची सक्ती, साठा रजिस्टर न ठेवणे अशा अनियमिततेमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यात आठ तालुक्यांत एकूण २०९ कृषी सेवा केंद्रे असून खरीप हंगामासाठी शेतकरी बियाणे, खते आणि औषधांच्या खरेदीला लागले आहेत. याच काळात गैरप्रकार वाढल्याच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने धडक मोहीम राबवली आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *