3 idiots ‘चा सिक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 3 idiots ‘चा सिक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. 28 : २००८ मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी या त्रिकुटाचा ‘3 इडियट्स’ हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता. अनेक वर्षांपासून प्रेक्षक ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलची आतुरतेनं वाट पाहत होते. ‘3 इडियट्स 2’ लवकरच मोठ्या पडद्यावर येईल, अशी माहिती अमीर खानने दिली आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खानच ‘एक दिन’हा चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. याची निर्मिती आमिरनेच केली आहे. यावेळी प्रमोशन दरम्यान त्याने ‘3 इडियट्स सिक्वेल बद्दल माहिती दिली.

‘3 इडियट्स’ च्या सिक्वलबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला की, टीम सध्या डेव्हलपमेंटवर काम करत आहे आणि त्यांनी चित्रपटाची कथा ऐकली आहे. अभिनेत्यानं चित्रपटाची कथा उत्कृष्ट असल्याचंही सांगितलं. सिनेमाच्या पहिल्या भागाचा संदर्भ सिक्वलमध्ये असेल, असं आमिर खानने सांगितलं.

पटकथेवर अजूनही काम सुरू आहे. चित्रपटाची कथा जवळपास एका दशकानंतरच्या पात्रांभोवती फिरते. आमिर खाननं असंही सांगितलं की, तो फुन्सुख वांगडूच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी आणि राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करण्यासाठीही उत्सुक आहे. या अपडेटमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. रँचो, फरहान आणि राजू रस्तोगी या वर्षांमध्ये कसे बदलले आहेत हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *