मुंबई, दि. २२ : गणेश चतुर्थीच्या आधी मुंबईचे सगळे खड्डे बुजवण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. मुसळधार पावसामुळं इंदिरानगर येथून सुरु होणाऱ्या वाकोला ब्रिजवरही खड्डे निर्माण झाले आहेत. हा पूल एमएमआरडीएने बांधलेला आहे तरी देखील यावर अनेक खड्डे लोकांना त्रासदायक ठरत असल्याने खड्डे बुजवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत. मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More
पुणे, दि २२: इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया (ISB&M), पुणे येथे “उत्कृष्ट दर्जाचे संशोधन डिझाईनिंग व पब्लिशिंग” या विषयावर आंतरराष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (FDP) 2025 पार पडला. संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार व डॉ. अरुण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित या चार दिवसीय हायब्रीड कार्यक्रमात ६५ हून अधिक संशोधक सहभागी झाले. या कार्यक्रमात डॉ. मीना बेईगी […]Read More
मुंबई, दि २२लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र मिळण्यासाठी चालू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाला यावर्षी 130 वर्षे पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य संपूर्ण होणार आहे या उत्सवा जवळपास दहा हजार कोटीची उलाढाल असते या उत्सवामध्ये मूर्तिकारापासून दुर्वा फुले फळे विकणारे सर्व उत्सवात सहभागी होतात आणि त्यांना रोजगार उपलब्ध होतो. महाराष्ट्राचे आदित्य […]Read More
बीड दि २२….बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात बैल पोळा सण हा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील नागदरा येथे बैल पोळा अनोख्या पध्दतीने आणि पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला आहे. गावात असलेल्या नागेश्वर मंदिर आणि मारुती मंदिराला बैल प्रदक्षिणा […]Read More
मुंबई, दि २२परंपरागत देशी खेळ केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारेच नाहीत तर या खेळांमुळे संस्कृती संवर्धनाचे बहुमूल्य कामही होत राहील, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती श्री. राम शिंदे यांनी केले. कुर्ला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचा आज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम […]Read More
ठाणे, दि २२ जनता दरबारबद्दल आज लोक आपली समस्या घेऊन येत आहेत, बऱ्याचशा समस्या या मानवनिर्मित आहेत, नैसर्गिक समस्या कमी आहेत, प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे, निश्चितपणे मागच्या जनता दरबारचा निपटारा समस्यांचा बरापैकी सोडवलेला आहे मला विश्वास आहे की प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी जनसामान्याच्या समस्या योग्य मार्गाने सोडवतील बिल्डर लोकांनी जुन्या लोकांना बिल्डिंग मधील जागा खाली […]Read More
नांदेड दि २२– नांदेड जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशा शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. मागील झालेल्या चार ते पाच दिवसांपुर्वी अतिवृष्टी व ढगफुटी पावसामुळे नदीकाठच्या शेतींना तळ्याचे स्वरूप आले असून सर्वच पिके पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पाण्याखाली गेलेली सोयाबीन, कापूस, तूर ही पिके सडल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा अस्मानी संकट उभे झाले आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ : २१ जुलैपासून सुरू झालेल्या संसदेतल्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करत अधिवेशन संपल्याची घोषणा केली. या महिनाभर चाललेल्या अधिवेशनात लोकसभेत १२ तर राज्यसभेत १५ विधेयकांना मंजुरी मिळाली. अधिवेशनात एकूण १२० तासांच्या चर्चेची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र […]Read More
नवी दिल्ली,दि. २१ : भारताच्या संसदेत आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे देशातील ऑनलाईन मनी गेमिंगवर कठोर बंदी घालण्यात येणार आहे. “ऑनलाईन गेमिंग प्रमोशन आणि रेग्युलेशन विधेयक 2025” हे विधेयक दोन्ही सभागृहांत बहुमताने मंजूर झाले असून, यामुळे सट्टा, जुगार, फँटसी स्पोर्ट्स, रमी, पोकर आणि तत्सम पैशांचे व्यवहार असलेले गेम्स पूर्णतः बेकायदेशीर ठरवले जातील. सरकारने […]Read More
गुवाहाटी, दि. २१ : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी आज घोषणा केली की, बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यापासून रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात १८ वर्षांवरील लोकांना पहिल्यांदाच आधार कार्ड मिळणार नाही. जर १८ वर्षांवरील लोकांना अद्याप आधार कार्ड मिळाले नसेल तर त्यांना फक्त एक महिन्याची मुदत दिली जाईल, असे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. […]Read More