mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

नक्षलग्रस्त भागात राष्ट्रध्वज फडकवल्याने तरुणाची हत्या

कांकेर, दि. २२ : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कांकेरच्या बिनागुंडा या गावातस्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारतीय राष्ट्रध्वज फडकावल्याने मनीष नुरुटी (२४) या तरुणाची हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. १५ ऑगस्ट रोजी बिनागुंडा गावात मनीष आणि मंदिरातील इतर ग्रामस्थांनी भारत माता की जयच्या घोषणा देत राष्ट्रध्वज फडकवला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ […]Read More

बिझनेस

OpenAI लवकरच भारतात उघडणार आपले कार्यालय

मुंबई, दि. २२ : ChatGPT ची मूळ कंपनी OpenAI ने आज सांगितले की ते या वर्षाच्या अखेरीस नवी दिल्लीत भारतात आपले पहिले कार्यालय उघडेल. कंपनीला भारतात आपली उपस्थिती मजबूत करायची आहे. वापरकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत ही कंपनीची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. दिल्लीतील कार्यालयाचे स्थान अद्याप उघड झालेले नाही. तथापि, OpenAI ने भारतात कायदेशीर अस्तित्व […]Read More

देश विदेश

निवारा केंद्रातील श्वानांना मोकळं सोडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली, दि. २२ : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) मोकाट तथा भटक्या कुत्र्यांबद्दलच्या आपल्याच मागील आदेशात किंचित सुधारणा करताना सर्वोच्च न्यायालयाने राजधानी परिक्षेत्रातील भटक्या कुत्र्यांना लसीकरण करून त्यांच्या मूळ भागात सोडले जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. पण रेबीज-संक्रमित किंवा आक्रमक कुत्र्यांना सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही. पण आता श्वानप्रेमी रस्त्यावर वाटेल तेथे […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यातील १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजार रुपये अनुदान

मुंबई, दि. २२ : यावर्षी गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून दर्जा देण्यात आला आहे. गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिलं आहे. राज्यतील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी 25000 रुपये भांडवली अनुदान दिलं जाणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून सांस्कृतिक […]Read More

महानगर

*सर्व गृहनिर्माण बांधकामात गिरणी कामगार घरांसाठी जागा राखीव ठेवा!

मुंबई, दि २२सरकारकडून उभ्या करण्यात येणाऱ्या कोणत्याही गृहनिर्माण बांधकामात आता गिरणी कामगारांसाठी राखीव जागा ठेवा,अशी मागणी आपण नुकतीच सरकारकडे केली आहे,अशी ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे गिरणी कामगार मुलांच्या गुणगौरव‌ सोहळ्याला बोलताना दिली.‌‌ राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने संघटनेचे आद्य संस्थापक आणि कामगार महर्षी स्व. गं.द.आंबेकर यांची ११८ वी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

विकास गर्ग यांची श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणच्या अध्यक्षपदी निवड

पुणे, दि २२श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणच्या अध्यक्षपदी विकास टी. गर्ग यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच ३१ मार्च २०२८ पर्यंत कार्यभार पाहणारी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. १८ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पंच कमिटीचे सदस्य कृष्णकुमार गोयल, वेदप्रकाश गुप्ता व रामअवतार अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. पंच कमिटीच्या […]Read More

देश विदेश

पाकीस्तानात कारखान्यांपेक्षा मशिदी, मदरशांची संख्या अधिक

इस्लामाबाद, दि. २२ : देशाच्या पहिल्या आर्थिक जनगणनेच्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये २३,००० कारखान्यांच्या तुलनेत ६,००,००० हून अधिक मशिदी आणि ३६,००० धार्मिक मदरसे आहेत. हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा रोख रकमेची कमतरता असलेला देश ७ अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजच्या दुसऱ्या पुनरावलोकनासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी वाटाघाटी करत आहे. आर्थिक क्षेत्राशी संबंधित डेटा लोकसंख्या आणि गृहनिर्माण जनगणना, २०२३ […]Read More

राजकीय

*महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले तर ते कर्तृत्व सिद्ध करतात, 

पुणे, दि २२: भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे व बँकांच्या राष्ट्रीयकृत घोरणांमुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे. मात्र स्वातंत्र्यवेळी देशातील साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. कालांतराने राजीव गांधी यांच्या काळात देशात रोजगार पुरक शिक्षण व्यवस्था व  संगणक व इंटरनेट क्रांती झाली. अन् डिजिटल इंडियाची पायाभरणी झाली. यातून आपल्याला दिसून येते की देशात महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य […]Read More

देश विदेश

अमेरिकेत विदेशी ट्रक चालकांवर बंदी

मुंबई, दि. २२ : अमेरिकेने सर्व परदेशी ट्रक चालकांना व्हिसा देणे तात्काळ थांबवले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी काल (दि. 21) रोजी या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, “आम्ही तात्काळ प्रभावाने व्यावसायिक ट्रक चालकांसाठी वर्कर व्हिसा जारी करण्यावर बंदी घालत आहोत.” हा निर्णय हरजिंदर सिंग नावाच्या एका […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सिंहगड रोडवर साकारतेय भव्य नेत्र रुग्णालय. रविवारी होणार उद्घाटन

पुणे, दि २२: सिंहगड रोड परिसरात आरोग्यसेवेच्या सुविधेत भर घालत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या डॉ. दूधभाते नेत्रालय व रेटीना सेंटरचे उद्घाटन येत्या रविवारी, २४ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. माणिकबाग पेट्रोल पंपाशेजारील गल्लीमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या या नेत्ररुग्णालयाचा भव्य सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या प्रसंगी महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई […]Read More