गिरिश महाजनांना ‘गेट आऊट’ म्हणणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल

 गिरिश महाजनांना ‘गेट आऊट’ म्हणणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल

मुंबई, दि. 24 : मुंबईतील वरळी परिसरात भाजपच्या जनआक्रोश मोर्चादरम्यान वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना अडवून त्यांना Get Out अशा शब्दांत खडेबोल सुनावले होते. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने या महिलेविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपने वरळीच्या जांबोरी मैदानापासून एनएससीआय डोमपर्यंत जनआक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चामुळे वरळी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यावेळी एका स्थानिक महिलेने आपला संयम गमावला आणि थेट मंत्री गिरीश महाजन यांना अडवून प्रश्नांचा भडिमार केला. “तुमचं हे काय चाललंय? इथून चालते व्हा! तुमच्या मोर्चामुळे शेकडो लोक अडकले आहेत,” अशा शब्दांत महिलेने महाजनांना खडेबोल सुनावले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यानंतर या महिलेविरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने वरळी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.

या प्रकरणावर बोलताना झेन सदावर्ते म्हणाली की, एक महिला कोण आहे? मर्सिडीज किंवा बसमधून येतायत. त्या महिला पोलिसांना शिवीगाळ करत होत्या, अपशब्द बोलत होत्या. पोलिसांचा अपमान त्यांनी उघडपणे केला आहे. दिवसरात्र पोलीस आपली रक्षा करतात, आणि त्यांना काय तर शिव्या? महिला आरक्षणासंदर्भात मोर्चा होता, डिलिमिटेशन संदर्भात होता. मी तक्रार अशा विरोधात केली आहे. वाहतूक कोंडी झाली होती, अडथळा झाला. मात्र, मोर्चाच्या संघर्षातूनच लोकांना न्याय मिळाला आहे. रस्त्यावर येऊन आवाज उचलला नाही तर न्याय कसा मिळणार? असा सवाल तिने उपस्थित केला.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *