mmcnews mmcnews

विदर्भ

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘आर्थिक आधार’

       मुंबई, दि.१७ : सात वर्षांची देवांशी गेल्या अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. डॉक्टरांनी अखेर ‘यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया’ हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. तसेच उपचारासाठी 20 लाख रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले. मात्र, भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबापुढे या उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता. या कठीण काळात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष’चा कुटूंबीयांना आर्थिक आधार मिळाला. […]Read More

शिक्षण

पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

मुंबई, दि. १७ : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवी मध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे. यामुळे 2025-26 या शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे […]Read More

ट्रेण्डिंग

प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबवर 32 गुन्हे दाखल

मुंबई, दि. १७ : प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब वर तब्बल 32 FIR दाखल करण्यात आल्या आहेत. क्रिप्टो फ्रॉड केसमध्ये जावेद हबीबचं नाव जोडलं गेलं आहे.उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील पोलिसांच्या टीमने बुधवारी जावेदच्या घरी छापा टाकला. पण पोलिसांना जावेद घरी सापडला नाही.पोलिसांच्या माहितीनुसार, जावेद इंटरोगेशनपासून स्वत:चा बचाव करत आहे आणि तो सध्या फरार आहे. पोलीस तपासात […]Read More

ट्रेण्डिंग

हर्बल हुक्क्याला कायदेशीर परवानगी

मुंबई, दि. १७ : मुंबई : हर्बल किंवा तंबाखूविरहित हुक्का पुरवणे कायदेशीर असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने २०१९ मध्ये दिलेल्या आदेशाची पुन्हा आठवण करून देत हर्बल हुक्कांना परवानगी असल्याचे स्पष्ट केले आणि राज्य सरकारला कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करण्याचे निर्देश दिले. हर्बल हुक्का पुरवणाऱ्या रेस्टॉरंट्सवर पोलिसांनी कारवाई करू नये, यासाठी दाखल करण्यात आलेल्या […]Read More

ट्रेण्डिंग

200 हून अधिक कुख्यात नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

जगदलपूर, दि. १७ : छत्तीसगढ येतील जगदलपूर येथे 153 शस्त्रांसह एकूण 208 नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केले आहे. यात 98 पुरुष आहेत. नक्षलवादी शस्त्रे समर्पण केल्यानंतर पुन्हा मुख्य प्रवाहात सामील होतील. जगदलपूर येथे होणारा हा आत्मसमर्पण सोहळा छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. या घटनेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा […]Read More

ट्रेण्डिंग

क्रिकेटमध्ये आला ‘Test Twenty ’ हा नवीन प्रकार

मुंबई, दि. १७ : क्रिकेट प्रेमींना आता क्रिकेटचा एक नवीन फॉर्मेट बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा क्रिकेटच्या इतिहासात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. १५ मार्च १८७७ रोजी पहिला कसोटी सामना खेळण्यात आला. त्यानंतर वनडे हे नवीन स्वरूप आले. आणि मग उदयाला अली ती म्हणजे टी-२० जी आता प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यानंतर द हंड्रेड आणि टी-१० […]Read More

देश विदेश

ऑनलाइन जुगार प्रकरणी न्यायालयाकडून सरकारला नोटीस

नवी दिल्ली, दि. १७ : ऑनलाइन जुगार आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरआज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने म्हटले की, “हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारी वकिलाला याचिकेची प्रत द्या. ते त्यात लक्ष घालतील आणि नंतर पुढील सुनावणीत आम्हाला मदत करतील.” […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजची कु. गौरी गरुड किकबॉक्सिंग मध्ये जिल्ह्यात

पुणे, दि १७: पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा स्तर किकबॉक्सिंग स्पर्धा सन २०२५–२६ नुकतीच आंबेगाव बुद्रुक येथे पार पडली. या स्पर्धेत ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या विद्यार्थिनी कु. गौरी गरुड हिने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तिच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

संतांच्या नावे महामंडळ स्थापन करून सरकार जाती जातीमध्ये द्वेष निर्माण

पुणे, दि १७संत महात्म्यांच्या नावाने वेगवेगळ्या समाजाची आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून हे सरकार जाती-जातीमध्ये द्वेष निर्माण करीत आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघ प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केला.गुरुवारी (दि.१६ ऑक्टोबर) पिंपरी, पुणे येथे महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघ व मायक्रो ओबीसी, अलुतेदार, बलूतेदार, विमुक्त, भटके समाजाच्या जिल्हा प्रतिनिधींची महाराष्ट्र प्रदेश बैठक आयोजित […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला चालना; पुणे महापालिकेला जमीन प्रदान

मुंबई दि १७ : पुणे शहरातील मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यासाठी महसूल व वन विभागाने पुणे महानगरपालिकेला ११,०१५ चौरस मीटर (१ हेक्टर १०.१५ आर) इतकी शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करण्यास मंजुरी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला नवे बळ मिळणार असून, मुळा-मुठा नदीच्या विकासाचा मार्ग […]Read More