राजेश मोरे यांची शिवडी विभाग अध्यक्ष पदी निवड
मुंबई, दि २२
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने, नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवडी विधानसभेच्या विभाग अध्यक्ष पदी राजेश मोरे यांची निवड करण्यात आली आहे. राजेश मोरे यांनी पक्षाचे काम तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवले असून त्यांच्या अडीअडचणी त्यांनी प्रामाणिकपणे सोडवले आहेत. त्यांच्या या गाण्याची दखल घेऊन त्यांना हे पद दिले असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि मान्यवरांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे.
विभाग अध्यक्ष पदाची जबाबदारी ही माझ्यासाठी केवळ सन्मानाची गोष्ट नसून, ती मोठं कर्तव्य आहे.
माझ्यावर सोपविलेल्या या जबाबदारीचे पालन मी मनापासून, प्रामाणिकपणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्वज्ञानाशी प्रामाणिक राहून काम करीन. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण आपल्या विभागाचे कार्य अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवून समाजहितासाठी प्रयत्नशील राहीन अशी माहिती राजेश मोरे यांनी दिली.JS/ML/MS