मुंबई, दि. ६ : : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांना ऑनलाइन बेटिंग प्रकरणात मोठा झटका बसला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) कारवाई करत दोन्ही खेळाडूंच्या एकूण ११.१४ कोटी रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा संबंध 1xBet या बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी आहे. तपासात असे […]Read More
टोकीयो, दि. ६ : जपानमध्ये सध्या अस्वलांच्या हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक अस्वले मानवी वस्त्यांमध्ये शिरून नागरिकांवर हल्ले करत आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी मृत्यू आणि गंभीर जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. जपानने आज अस्वलांना पकडण्यासाठी अनेक भागात स्व-संरक्षण दल (SDF) तैनात केले आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ […]Read More
मुंबई, दि ६बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल. तर, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध झाल्यानंतर दिनांक १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना सादर करता येतील. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये […]Read More
मुंबई, दि ६‘वंदे मातरम’या राष्ट्रगानाला 150 वर्षे पूर्ण होत असल्यानिमिताने भारतीय जनता पार्टीतर्फे शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी देशभर 150 ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत. राज्यात 15 ठिकाणी या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांत केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री सहभागी होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र […]Read More
पुणे, दि ६: जगातील संवेदनांचा अभ्यास करत समाजाविषयी विचार करणारे चिंतनशील भाष्यकार, साहित्यिक तसेच राजकारणावर परखडपणे भाष्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे होय. पुलं हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावरील महत्त्वाचे घटक आहेत. या महनीय व्यक्तिमत्त्वाची छाया त्यांच्या आठवणींमधून, विचारांमधून की त्यांनी केलेल्या प्रेरणादायक कार्यामधून शोधायची हा निकडीचा प्रश्न आहे. पुलंचे बहुआयामी विचार युवा पिढीला प्रेरक […]Read More
मुंबई, दि ६ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची ४० एकर जमीन भ्रष्ट मार्गाने बळकावल्याचे उघड झाले आहे. पार्थ पवार यांनी हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयात म्हणजे कवडीमोल भावाने हडप केली असून स्टँप ड्युटी फक्त ५०० रुपये दिली आहे. सरकारच्या ताब्यात असणा-या वतनाच्या या जमिनीचा व्यवहार झालाच […]Read More
मुंबई, दि ६ मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तर काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुकांनी गर्दी केलेली आहे. इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेसने अर्ज मागविले असून आतापर्यंत ११५० पेक्षा अधिक अर्ज गेले आहेत. मुंबईतील सहाही जिल्ह्यातून इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लवकरच महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याने अर्जास मुदतवाढ दिली जाणार आहे असे मुंबई […]Read More
अलिबाग दि ६ – रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातअसलेल्या माथेरान येथील मिनी ट्रेन ही माथेरान येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी नेरळहून माथेरान ला जाणण्यासाठी एक पर्वणी असते. इंग्रजाच्या काळापासून ही ट्रेन आजतागायत सुरु आहे. दरवर्षी फक्त पावसाळ्यात ही ट्रेन बंद ठेवली जाते. आजपासून पुन्हा ही ट्रेन नेरळ ते माथेरान सुरू करण्यात आली असून त्यामुळे नेरळ येथे आलेल्या पर्यटकांमध्ये […]Read More
पिंपरी, पुणे (दि. ०५ नोव्हेंबर २०२५) बहीण भावाचे जिव्हाळ्याचे नाते असते. वेळ प्रसंगी बहिणीचे रक्षण करणे ही भावाची जबाबदारी असते. सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता बहिणींच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आहे हे खूप कौतुकास्पद आहे असे माजी आमदार अश्विनीताई जगताप यांनी सांगितले.पिंपळे निलख येथे सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला भगिनींसाठी भाऊबीज या थीमवर […]Read More
पुणे, दि ६: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी माजी नगरसेविका हिमाली नवनाथ कांबळे यांची निवड करण्यात आली. पुणे शहर पदाधीकाऱ्यांच्या बैठकीत आज सर्वानुमते ही निवड करण्यात आली. या बैठकीला आरपीआयचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनावणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, […]Read More