मुंबई दि. ११ : महसूलमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नावाची घोषणा केली. बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून ५१ टक्के मते घेऊन दोन-तृतीयांश बहुमताने महाराष्ट्राच्या सर्व […]Read More
मुंबई, दि ११राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे धाराशीव जिल्ह्यातील नेते अशोक भाऊ जगदाळे यांच्यासह असंख्य नेते व पदाधिकारी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.. अशोक जगदाळे यांच्याबरोबर नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष नितीन […]Read More
मुंबई, दि ११बृहन्मुंबई महानगरपालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, १२०० मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि ८०० मिलिमीटर व्यासाच्या विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील ३०० मिलिमीटर, ६०० मिलिमीटर व ९०० मिलिमीटर व्यासाच्या एकूण पाच झडपा बदण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. हे काम शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून शनिवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ […]Read More
मुंबई, दि. ११ :- पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या संगमातून केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर जबाबदार वृत्तनिर्मितीची नवीन मानसिकता घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी केले. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृत्तपत्र तसेच डिजिटल माध्यम […]Read More
मुंबई, दि. ११ : राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोधचिन्ह स्पर्धेतील विजेता आणि घोषवाक्य […]Read More
मंगळवार, दि. ११ नोव्हेंबर २०२५ (सहकार विभाग)नाशिक, नागपूर व धाराशिव या जिल्हा मध्यवती सहकारी बँकांना ८२७ कोटी रुपयांचे शासकीय भागभांडवल (विधि व न्याय विभाग)न्यायालयीन संकुले तसेच न्यायाधिशांची निवासस्थाने यांच्या सुरक्षेत वाढ. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून अतिरिक्त सुरक्षारक्षक उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता खर्च तरतुदीस मान्यता (वित्त विभाग)पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढविण्यास […]Read More
पुणे दि. ११ : देहूरोड येथील श्री शिवाजी माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व व्यवसायातील १९९६-१९९७ या १० वी बॅचमधील शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा नुकताच थाटामाटात पार पडला. यावेळी तब्बल २८ वर्षानंतर शिक्षक व माजी विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह, प्रेम, उर्जा यांचा सुंदर मिलाफ पहावयास मिळाला. या स्नेहसंमेलनात विविध विषयातील सुमारे ४० शिक्षक […]Read More
चंद्रपूर दि ११ : — चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर परिसरात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला अखेर वनविभागाच्या पथकाने यशस्वीपणे जेरबंद केले. गेल्या काही दिवसांपासून या वाघाचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून विशेष पथके तैनात करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी शिवरा आणि शंकरपूर येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि […]Read More
गोंदिया दि ११ : राज्य सरकारच्या नक्षलआत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत जहाल नक्षलवादी व दलम सदस्य वर्गेश उर्फ कोसा मंगलू उईका (वय २६, रा. बेदरे, पो.स्टे. जगरगुंडा) याने गोंदिया पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण केले. वर्गेशवर ३ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस होते. लहानपणापासूनच नक्षल चळवळीत सक्रिय राहिलेल्या वर्गेशने अखेर शासनाच्या पुनर्वसन धोरणावर विश्वास ठेवत शस्त्रसंघर्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने […]Read More
मुंबई, दि. १० : निवडणूक होत असलेल्या 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता आजपासून नामनिर्देशपत्र सादर करण्यास सुरुवात झाली असून, त्यासाठी 664 उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून […]Read More