mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

भीमा कोरेगाव विजयस्तंभ शोर्यदिन नियोजनात 40 टक्के वाढ करावी :

पुणे, दि १४: १ जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या देशभरातील अनुयायांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये 40 टक्क्यांची वाढ करावी अशी आग्रही मागणी भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी आज केली आहे. येरवडा येथील सामाजिक न्याय भावनांमध्ये हवेली प्रांताधिकारी यशंवत माने यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती व […]Read More

ट्रेण्डिंग

घरबसल्या मिळतील पोस्टाच्या या सेवा

मुंबई, दि. १३ : पोस्ट ऑफिसच्या अनेक सेवांसाठी रांगेत ताटकळत उभं राहण्याची गरज नाही. भारतीय टपाल खात्याने नवीन मोबाईल ॲप Dak Seva 2.0 सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोबाईलवरूनच मनी ऑर्डर, पार्सल ट्रॅकिंग, विम्याचा हप्ता भरणे आणि इतर सेवा सहज उपलब्ध होतील. ॲप वापरण्यास सोपं असल्याचा दावा या या खात्याने केला आहे. युझर्स फ्रेंडली प्लॅटफॉर्ममुळे […]Read More

देश विदेश

जपानी तरुणीने AI बॉयफ्रेंडसोबत केले लग्न

टोकीओ, दि. १३ : जपानमधील ओकायामा प्रांतातील ३२ वर्षीय कानो नावाच्या तरुणीने आपल्या AI बॉयफ्रेंडसोबत विवाह केला आहे. तिने ChatGPT च्या मदतीने स्वतःसाठी एक डिजिटल जोडीदार तयार केला होता, ज्याला तिने ल्यूने क्लाउस असे नाव दिले. तीन वर्षांच्या खऱ्या नात्यातील अपयशानंतर तिने या AI साथीदाराकडे भावनिक आधारासाठी वळले. सततची संवाद साधण्याची क्षमता, समजून घेण्याची वृत्ती […]Read More

ट्रेण्डिंग

Digital Gold ‘मधील गुंतवणूकीबाबत SEBI कडून धोक्याचा इशारा

मुंबई, दि. १३ : SEBIने गुंतवणूकदारांना डिजिटल गोल्ड किंवा ई-गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यापासून परावृत्त राहण्याचा गंभीर इशारा दिला आहे. सेबीने नुकतेच एका निवेदनात स्पष्ट केले की, असे प्रोडक्ट त्यांच्या नियामक कक्षेत येत नाहीत आणि त्यामध्ये ‘महत्त्वपूर्ण जोखीम’ आहे.काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स ‘डिजिटल गोल्ड’ किंवा ‘ई-गोल्ड’ उत्पादनांना भौतिक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सोपा पर्याय म्हणून प्रोत्साहित करत असल्याचे सेबीने […]Read More

महिला

९४ वर्षीय आजींनी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये जिंकली ४ सुवर्णपदके

पाणी देवी गोदारा या राजस्थानच्या बिकानेरमधील 94 वर्षीय आजींनी दृढनिश्चय आणि मेहनत याला वयाची मर्यादा नसते हे सिद्ध केले आहे. चेन्नई येथे आयोजित आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी अविश्वसनीय कामगिरी केली. त्यात त्यांनी चार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 4 सुवर्णपदके जिंकली आहे. ‘गोल्डन ग्रँडमा’ (Golden Grandma) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाणी देवींनी 100 मीटर धावण्याची शर्यत, डिस्कस थ्रो, शॉटपुट […]Read More

क्रीडा

“द चॅम्पियन स्टोरीज” -भारतीय महिला खेळांडूच्या यशकथांची मालिका

मुंबई, दि. १३ : “द चॅम्पियन स्टोरीज” या क्रीडा माहितीपट मालिकेचा पहिला भाग आज प्रदर्शित झाला. भारतीय क्रीडा क्षेत्रातील महिला खेळाडूंसाठी एक मजबूत आवाज असलेल्या अवंतिका मित्तल यांनी “द चॅम्पियन स्टोरीज” नावाचा एक डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. चॅम्पियन स्टोरीज नावाचा हा उपक्रम आता केवळ बॉक्सिंगपुरता मर्यादित राहणार नाही, तर इतर खेळांमधील महिला खेळाडूंच्या कथांवरही […]Read More

पर्यावरण

‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’ मध्ये पाठवण्याचे न्यायालयाचे निर्देश

मुंबई, दि. १३ : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर धुडगुस घालून नागरिकांना त्रस्त करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीच्या स्थलांतराबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. न्यायालयाने हा हत्ती तात्पुरत्या स्वरूपात गुजरातमधील ‘वनतारा’ सेंटरकडे हलवण्याचे निर्देश दिले आहेत. ‘वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅक्ट 1972 नुसार, हत्ती मानवी वस्तीसाठी धोकादायक ठरल्यास त्याला हलवण्याची तरतूद आहे, ज्याचा […]Read More

महानगर

मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

ठाणे दि १३ :- मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही अभियंते विशाल डोळस आणि समर यादव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अभियंत्यांचे वकील आता शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर अभियंत्यांवर अटकेची टांगती तलवार कायम राहिली आहे. अभियंत्यांच्या वकिलांनी सांगितले की अपघात हा गर्दीमुळे झाला असून अभियंत्यांची कोणतीही चूक […]Read More

राजकीय

कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी ४२ कोटींच्या स्टॅम्पड्युटीची नोटीस योग्यच !

मुंबई, दि. १३ : पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार सरकारी मालमत्तेशी संबंधित असल्याने तो तांत्रिकदृष्ट्या रद्द करावा लागेल, मात्र हा व्यवहार रद्द करताना संबंधितांना एकूण ४२ कोटी रुपयांची स्टॅम्पड्युटी भरावीच लागेल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मंत्री बावनकुळे म्हणाले, “मी कालच सांगितले होते की हा विषय मी तपासणार आहे. तपासणी केल्यावर लक्षात […]Read More

राजकीय

नामनिर्देशनपत्रासोबत संकेतस्थळावरकागदपत्र नको, शनिवारी देखील अर्ज स्वीकारणार

मुंबई, दि. १३ : नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआऊट) घेवून व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे, […]Read More