मेलबर्न, दि. १० : आशियाई कपमधून बाहेर पडल्यानंतर इराणच्या महिला फुटबॉल संघातील पाच खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने मानवतावादी व्हिसा देऊन आपल्या देशात राहण्याची परवानगी दिली आहे. गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी इराणच्या संघाने आपले राष्ट्रगीत गायले नव्हते. यानंतर त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. रविवारी गोल्ड कोस्ट स्टेडियमबाहेर शेकडो लोकांनी संघाच्या समर्थनार्थ “सेव्ह अवर गर्ल्स” […]Read More
मुंबई, दि. १० : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ (लवकर या-लवकर जा) ही विशेष योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेअंतर्गत मुंबई महानगरातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९.१५ ते ९.४५ या वेळेत […]Read More
मुंबई दि १० : त्रिपुरा येथील माणिक्य राजघराण्यातील सदस्य व तेलंगणाचे माजी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी जिष्णु देव वर्मा यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]Read More
मुंबई, दि. १० : RTE प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारने लादलेली एक किलोमीटर अंतराची किचकट अट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, या अटीमुळे ज्या पालकांना अर्ज भरता आले नव्हते, त्यांच्यासाठी उच्च न्यायालयाने अर्जाची मुदत ३ दिवसांनी वाढवून दिली […]Read More
नवी दिल्ली, दि. १० : इराणच्या हॉर्मुझ जलमार्गातून होणारा गॅस पुरवठा ठप्प झाल्यानंतर भारत सरकारने आता देशभरात ‘अत्यावश्यक वस्तू कायदा 1955’ लागू केला आहे. हे पाऊल उचलले आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांनी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर सध्या बंदी घातली आहे. या बंदीमुळे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद होण्याची […]Read More
नवी दिल्ली, दि. १० : अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज (दि.१०) Essential Commodities Act, 1955 (आवश्यक वस्तू कायदा) लागू केला आहे. नैसर्गिक वायू आणि एलपीजीचा पुरवठा खंडित होऊ नये तसेच घरगुती गॅस उपलब्धता कायम राहावी, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, नैसर्गिक वायूचा […]Read More
पुणे, दि १०: बिहारमधील गया येथे असलेल्या ऐतिहासिक ”महाबोधी महाविहार”च्या व्यवस्थापनाचा अधिकार पूर्णपणे बौद्ध धम्मियांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी पुण्यात धरणे आंदोलन करण्यात आले. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर) येथे पुणे परिसरातील भिक्खू संघाच्या वतीने हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात भन्ते डॉ. नागघोष महाथेरो, भन्ते बुद्धघोष महाथेरो, भन्ते शाक्यपुत्र, भन्ते राजरत्न, शक्यपुत्र राहुल,धम्मरखीत, भन्ते […]Read More
मुंबई, दि १०गोरेगाव (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील ३ दुकानांचे तसेच ५डी रस्त्यावरील १० दुकानांच्या वाढीव बांधकामांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभागाकडून आज (दिनांक १० मार्च २०२६) निष्कासन करण्यात आले. उपायुक्त (परिमंडळ-४) श्रीमती भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (पी दक्षिण विभाग) श्री. अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. गोरेगाव (पश्चिम) येथील स्वामी […]Read More
पुणे, दि १०: प्रत्येक सरकारी योजनेमागील हेतू विधायक असला तरी प्रभावी अंमलबजावणीच्या अभावामुळे अनेक योजना जनसामान्यांपर्यंत अपेक्षित प्रमाणात पोहोचत नाहीत. ‘विकसित भारत’ ही संकल्पना प्रेरणादायी असली, तरी तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व भारतीयांची सामूहिक जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत माजी खासदार तथा पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले. एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी […]Read More
मुंबई दि १० : गेल्या वर्षी मंजूर करण्यात आलेल्या एक लाख तेरा हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांचा हिशेबच लागत नाहीत. अनेक योजनांना निधीच उपलब्ध करून देण्यात आला नाही, या अर्थसंकल्पात देखील तीच स्थिती असेल. राज्यावरील कर्ज डोंगर वाढवूनच विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न दिसत आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करताना राज्याचं कर्ज सहा पट करून ठेवलं आहे […]Read More