Month: March 2026

बिझनेस

Meesho कंपनीला १५०० कोटींची टॅक्स नोटीस

मुंबई, दि. 9 : ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी Meesho ला आयकर विभागाने १,५०० कोटी रुपयांच्या कर मागणीची नोटीस बजावली आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची घसरण होऊन गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. Meesho च्या एक्सचेंज फायलिंगनुसार, आयकर विभागाने २०२३-२४ या मूल्यांकन वर्षासाठी एकूण १,४९९.७३ कोटी रुपयांच्या कराची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम कंपनीच्या […]Read More

देश विदेश

प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान

काठमांडू, दि. ९ : नेपाळच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडला आहे. लोकप्रिय रॅपर आणि काठमांडूचे माजी महापौर बालेंद्र (बालेन) शाह यांची पंतप्रधानपदी निवड निश्चित झाली आहे. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाने, राष्ट्रिया स्वतन्त्र पार्टी (RSP) ने बहुमत मिळवले असून शाह हे नेपाळच्या संसदीय इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरणार आहेत. शाह यांचा प्रवास अत्यंत वेगळा आहे. […]Read More

राजकीय

बेस्ट ची आर्थिक स्थिती मजबूत करा आमदार सुनील शिंदे

मुंबई, दि ९मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट संदर्भात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर बोलताना, बेस्टचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मुंबईकरांना परवडणारी, सुरक्षित व विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा मिळावी यासाठी बेस्टची आर्थिक व प्रशासकीय स्थिती मजबूत करण्याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे आमदार सुनिल शिंदे यांनी आज सभागृहात मांडले.सध्या बेस्टच्या ताफ्यातील २६५८ इलेक्ट्रिकल बस या खाजगी कंत्राटदारांच्या आहेत, तर केवळ २४९ […]Read More

राजकीय

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन

मुंबई दि ९ : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आज पत्नी सुधा देव वर्मा यांचेसह मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य व […]Read More

राजकीय

आर-मध्य आणि आर-उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी अधिकाऱ्यांसोबत

मुंबई, दि ९आर-मध्य आणि आर-उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच माननीय श्री. प्रकाश य. दरेकर ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आर-मध्य आणि आर-उत्तर विभागातील विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पहिली महत्त्वाची ‘ओळख बैठक’ घेतली. या बैठकीत केवळ परिचय न थांबवता, प्रभागातील प्रलंबित विकासकामे आणि नागरिकांच्या तक्रारींचा पाढा वाचत त्यांनी प्रशासनाला कामाला लागण्याच्या सूचना केल्या. विकासकामांचा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते बोपोडीत कॅन्सर निदान व HPV

पुणे, दि ९ : महिलांच्या आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने कॅन्सरचे लवकर निदान आणि सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) बोपोडी येथील कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर प्रसूतीगृह व रुग्णालयात महिलांसाठी विशेष कॅन्सर निदान, सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधात्मक (HPV) लसीकरण व समग्र आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन उपमहापौर परशुराम वाडेकर  यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी […]Read More

महानगर

आरे कॉलनीत भाजपच्या महिला मोर्चा आयोजित साडी वॉकाथॉनमध्ये धावल्या हजारो

मुंबई, दि ९: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्ष (भाजप) महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, नगरसेविका प्रिती सातम यांच्या संकल्पना आणि नेतृत्वाखालीआयोजित करण्यात आलेल्या ‘साडी वॉकाथॉन – तिच्या पावलात शक्ती २०२६’ या उपक्रमाला महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला. या वॉकाथॉनमध्ये एक हजारांहून अधिक माता-भगिनींनी पारंपरिक साडी नेसून उत्साहात सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार […]Read More

महानगर

महा ई सेवा व आधार सेवा केंद्र धारकांच्या विविध मागण्या

मुंबई, दि ९महा-ई-सेवा व आदर्श व केंद्र धारकांच्या विविध मागण्याबाबत आज अजून मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात केंद्र धारक उपस्थित होते.राज्यातील महा ई सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र धारक हे शासनाच्या विविध डिजीटल सेवा व्दारे नागरिकांना सेवा पुरवत आहेत. या सेवामुळे शासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होवुन नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा […]Read More

महानगर

एस आणि टी प्रभाग समिती अध्यक्षपदी साक्षी दळवी

मुंबई, दि ९एस आणि ‘टी’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रीमती साक्षी दळवी या १० मते मिळवून विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री. सुरेश शिंदे यांना ८ मते मिळाली. दोन मते अवैध ठरली. ‘एस आणि ‘टी’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर […]Read More

महानगर

समग्र शिक्षा संघर्ष समितीचे 3378 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या

मुंबई, दि ९महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे समग्र शिक्षा अंतर्गत गेली 25 वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत कार्यरत असलेल्या सर्व केडरच्या सुमारे ते 3378 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजित करून कायम करण्यात यावे. या मागणीसाठी आझाद मैदानात समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या आंदोलनामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत […]Read More