Month: April 2023

राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफांचा जमीन अर्ज फेटाळला

मुंबई दि.11( एम एमसी न्यूज नेटवर्क) : साखर कारखान्याबाबतच्या आर्थिक व्यवहारात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेला अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने आज फेटाळून लावला. त्यामुळे मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर […]Read More

महानगर

जेपीसीची मागणी काँग्रेससह देशातील १९ पक्षांची

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अदानी समुहात एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पीएफचा पैसा बेकायदेशीरपणे गुतंवलेला आहे. हा कोट्यवधी जनतेच्या कष्टाचा पैसा आहे, त्याचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. अदानी कंपन्यांतील घोटाळ्याचे सत्य बाहेर आणायचे असेल तर संयुक्त संसदिय समितीच्या चौकशीतूनच सर्व सत्य बाहेर येऊ शकते. म्हणूनच काँग्रेससह देशातील १९ पक्षांनी जेपीसीची मागणी केली […]Read More

राजकीय

येणाऱ्या निवडणुका लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा मिळवू

पुणे, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्य राज्यांमध्ये निवडणूका लढवून त्यात किमान चार टक्के मते मिळवणे व लोकप्रतिनिधी निवडून येणे हा जो नियम आहे त्यामध्ये थोडीशी कमतरता झाली असेल परंतु येत्या चार – सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा सहज आम्हाला मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी […]Read More

मराठवाडा

धाराशिव जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतशिवारांची केली मुख्यमंत्र्यानी पाहणी

धाराशिव, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आमच्या सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे म्हणून आम्ही स्वतः बांधावर शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर भेटायला आलो असून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे, हे सरकार मायबाप शेतकऱ्यांचा आहे ,शेतकरी अन्नदाता आहे, बळीराजा आहे, या बळीराजावरचा संकट दूर होऊ दे असा आपण अयोध्येतील रामाला आणि तुळजाभवानीला साकडं घातला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री […]Read More

ट्रेण्डिंग

शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार आणि फळबागांसाठी एक लाख रुपयांची मदत

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या पत्रात मार्च व एप्रिल […]Read More

खान्देश

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत मदत

अहमदनगर,दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येऊन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात मदत वितरित करण्यात येईल.” अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी आज अहमदनगर मधील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला‌. त्यांच्या अडचणी जाणून‌ घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी‌ […]Read More

राजकीय

बाबरीच्या वेळी लपलेले भाजपचे उंदीर आता बाहेर पडताहेत…

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरीच्या बाबत केलेले वक्तव्य गंभीर आहे, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते अशी टीका उध्दव ठाकरे यांनी केली आहे , मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . सध्याचे पंतप्रधान पण त्यावेळी कुठेच नव्हते. तेव्हाचे भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी […]Read More

ट्रेण्डिंग

कोकणातील दापोली तालुक्यात रुजतोय चहाचा मळा

दापोली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चहाचा मळा म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर आसामचं नाव येतं. पण आता कोकणातील दापोली तालुक्यातील मुर्डी या समुद्रालगतच्या निसर्गरम्य गावात चहाच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी होत आहे. येथील प्रगतीशील कृषी पदवीधर शेतकरी विनय जोशी यांनी निसर्ग वादळानंतर उद्ध्वस्थ झालेल्या वाडीमध्ये चहा रोपे लागवडीचा नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. जोशी यांनी सव्वा […]Read More

ऍग्रो

अवकाळी ग्रस्तांची मुख्यमंत्र्यानी घेतली भेट

अहमदनगर , दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात रविवारी,९ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली‌ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला‌. त्यांच्या अडचणी जाणून‌ घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी‌ करण्याचे आदेश दिले. वनकुटे मधील पडझळ‌ झालेल्या‌ २२ कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून […]Read More

गॅलरी

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क): महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि आमदार छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, संचालक, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही […]Read More