महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क): महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि आमदार छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, संचालक, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
ML/KA/SL
11 April 2023