राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफांचा जमीन अर्ज फेटाळला

 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफांचा जमीन अर्ज फेटाळला

मुंबई दि.11( एम एमसी न्यूज नेटवर्क) : साखर कारखान्याबाबतच्या आर्थिक व्यवहारात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेला अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने आज फेटाळून लावला. त्यामुळे मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यासाठी जवळपास ४० हजार शेतकऱ्यांकडून पैसे घेऊनही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांना समभाग दिले नाहीत आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली, अशा आरोपाखाली ईडीने गुन्हा दाखल करून मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांना आरोपी केले आहे. ‘हा गुन्हा निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. भाजपचे किरीट सोमय्या यांनी वीट केल्यानंतरच चौकशीची कारवाई सुरू झाली’, असा युक्तिवाद मुश्रीफ यांच्यातर्फे न्यायालयात करण्यात आला. तर ‘मुश्रीफ यांचा गुन्ह्यात सहभाग असून कोठडीतील चौकशी गरजेची आहे.

आम्ही बजावलेल्या समन्सप्रमाणे ते चौकशीसाठी हजर राहिले. परंतु, त्यांनी तपासात सहकार्य केले नाही आणि चुकीची कागदपत्रे दिली’, असा युक्तिवाद ईडीतर्फे अॅड. हितेन वेणेगावकर यांनी केला. त्यानंतर निर्णय राखून ठेवत तो ५ एप्रिलला सुनावणार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. परंतु, निर्णय लिहिण्याचे काम अपूर्ण राहिल्याने आज ११ एप्रिल रोजी हसन मुश्रीफ यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी झाली . यावेळी विशेष पीएमएलए न्यायालयाने यांचा मुश्रीफ जमीन अर्ज फेटाळून लावला.

SW/KA/SL

11 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *