कोल्हापूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.12 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे ३६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रिकेट विश्वचषक विजेत्या टीम इंडियाच्या स्वागत परेडनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) रात्रभर मरिन ड्राइव्हची स्वच्छता केली. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना साफसफाई करताना ११ हजार किलो कचरा सापडल्याचे सांगितले. टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतली आहे. भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर चाहत्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. टीम इंडियाने २९ जून […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे आणि परिसराला खाडीच्या सान्निध्यामुळे खारफुटीच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा जैवविविधतेचा ठेवा लाभला आहे. मात्र शहराच्या अक्राळविक्राळ विस्तारामुळे आणि शहरनियोजन तसेच पर्यावरणीय धोरणांच्या योग्य अंमलबजावणीच्या अभावी खारफुटीच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. येथील बाळकुम, कोलशेत भागातील खाडीकिनारी परिसरातील खारफुटीवर मोठ्या प्रमाणात राडारोड्याचा भराव टाकून त्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले […]Read More
तेहरान, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इराणमध्ये अध्यक्षीय निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मतदानात आघाडीवर असलेल्या दोन उमेदवारांमध्ये दुसर्या टप्प्याच्या थेट लढतीत सुधारणावादी नेते ६९ वर्षीय मसूद पेझेश्कियान यांनी कट्टरपंथी उमेदवार सईद जलिली यांचा पराभव करून विजय मिळवला आहे. इराणमध्ये गेल्या महिन्यात हेलिकॉप्टर अपघातात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाल्यानंतर पजश्कियान […]Read More
पुणे, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे शहरातील गुन्हेगारी कृत्यांनी आता अक्षरशः कळस गाठला आहे. राजरोसपणे नियम मोडून आता गुन्हेगार पोलीसांवर हल्ले करू लागले आहेत. पुण्यात महिला पोलीस अधिकारी आणि तिच्या सहकाऱ्यांना पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशनच्या परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे मद्यधुंद अवस्थेत गाडी […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात १८ व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आता मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सज्ज आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या २३ […]Read More
सातारा, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी रथाचे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले, माऊलीच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी रथाचे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले. नीरा नदीच्या दत्त मंदिर घाट परिसरात पारंपरिक पद्धतीने माऊलीच्या चांदीच्या पादुकांना स्नान करण्यात आले. या सोहळ्यासाठी वीर […]Read More
मेचुका, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेचुका, ज्याला मेंचुखा असेही म्हणतात, हे अरुणाचल प्रदेशातील एक नयनरम्य आणि शांत गाव आहे. समुद्रसपाटीपासून 7000 फूट उंचीवर वसलेले, सियांग जिल्ह्यातील हे छोटे शहर भारत-चीन सीमेपासून सुमारे 29 किमी अंतरावर आहे. हिरव्यागार टेकड्या, बर्फाच्छादित पर्वत, पाइन वृक्ष, धबधबे, तलाव आणि नद्या यामुळे मेचुका अतुलनीय नैसर्गिक सौंदर्याचा अभिमान बाळगतो. […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने सेल मॅनेजमेंट ट्रेनी (तांत्रिक) पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. उमेदवार SAIL च्या अधिकृत वेबसाइट sail.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील: सर्वसाधारण: 103 पदेOBC: 67 पदेEWS: 24 पदेSC: 37 पदेST: 18 पदेएकूण पदांची संख्या: 249शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साताऱ्यातील पाटणमधील सोनवडे या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने सोनावडे या सरकारी रुग्णालयात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली होती. यावेळी त्या महिलेने त्रास होतोय हे सांगत असतानाही डॉक्टरांनी हात पाय बांधून तोंडात बोळा घालून निर्दयीपणे अनेक तास त्यांचे ऑपरेशन केले. त्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या पोटात दुखायला लागले. पण डॉक्टरांनी सलाईनमधून […]Read More