पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स मीडिया (X) म्हणजेच ट्विटरवर (Twitter) 100 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ग्लोबल लिडर बनले आहेत. मोदी यांच्यापुढे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे नाव आहे. भारतातील आणि देश-विदेशातील दिग्गज नेते याबाबतीत त्यांच्या आसपासही नाहीत. ‘एक्स’वर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या पाच जागतिक नेत्यांमध्ये मोदी दुसऱ्या स्थानी […]Read More
सिंधुदुर्ग, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने मुसळधार पाऊस होत आहे . त्यात दोडामार्ग तालुक्यात पावसाचा जोर काहीसा जास्त आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊन धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणाच्या चारी दरवाजातून हा विसर्ग सुरू झाला असून 46.38 […]Read More
पनवेल, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर शिवकर गावाच्या जवळ रात्री १.१५ च्या दरम्यान पुण्याकडे दिशेने पंढरपूर वारीला जाणाऱ्या बसला भीषण अपघात होऊन त्यात पाच जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. कल्याण डोंबिवली येथील एकूण ४ बस पंढरपूरला निघाल्या होत्या. कल्याण वरून पंढरपूर येथे भाविकांना […]Read More
कोल्हापूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले. हिंदुत्ववादी संघटनांनी विशाळगडाजवळील गजापूर येथे दगडफेक व जाळपोळ करत अनेक घरांचे तसेच वाहनांचे नुकसान केले.यातोडफोड केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल […]Read More
बर्लिन, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरो कप फुटबॉल २०२४ चा अंतिम सामन्यात स्पेन आणि इंग्लंडच्या संघात रोमहर्षक लढत पहायला मिळाली. अखेरीस स्पॅनिश संघाने अंतिम सामना २-१ने जिंकला आणि विजेतेपदावरही आपले नाव कोरले. यासह स्पेन ४ वेळा युरो कप जिंकणारा पहिला देश बनला आहे. मात्र, चौथी ट्रॉफी जिंकण्यासाठी त्यांना तब्बल १२ वर्षे प्रतीक्षा करावी […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खाण मंत्रालयाने सोन्याच्या खाणीसह १० खनिज खाणींची विक्री करण्याच्या सूचना झारखंड सरकारला दिल्या आहेत. राज्याने लिलाव न केल्यास केंद्र सरकार लिलाव प्रक्रिया सुरू करील असा इशारा देखील दिल्याचे सांगितले जाते. ब्लॉक जी२ (सामान्य) आणि जी३ (प्राथमिक) स्तरावर आहेत. या १० खाणींमध्ये एक तांब्याची, एक चुनखडीची आणि ग्रेफाइटच्या […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनंत अंबानीच्या लग्नासाठी मुंबईत दाखल झालेले शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आज शिवसेना प्रमुखांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीला भेट दिली. यावेळी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले आणि ठाकरे कुटुंबीयांनी त्यांच्या पादुका पूजन केले. या भेटीनंतर शंकराचार्यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना पुन्हा […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रकलेसाठीच्या साहित्य निर्मितीमध्ये जगप्रसिद्ध असलेल्या कॅम्लिन उद्योगसमूहाचे प्रमुख मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचे आज (१५ जुलै) सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३.३० वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे एक उत्तम उद्योजक व रंगांचा निर्माता हरवल्याची खंत उद्योग आणि कला विश्वातून व्यक्त करण्यात येत […]Read More
इस्लामाबाद. दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुरुंगात कैद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान सरकारने त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसांफ(PTI) वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान यांच्यावर दंगल भडकवणे, लाच घेणे आणि देशाच्या प्रमुखपदी असताना मिळालेल्या भेटवस्तू विकण्याचा आरोप आहे. पाकिस्तानचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अताउल्ला तरार यांनी […]Read More