नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाचे गृहमंत्री अमीत शहा यांनी संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असता सत्ताधारी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला, उपसभापतीनी परवानगी नाकारली त्यामुळे विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. सभापती नीलिमा गोऱ्हे यांनीही सभागृहाला पूर्व […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेट वे ऑफ इंडिया परिसरात एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. गेट वेहून एलिफंटा लेण्यांकडे जाणारी “निलकमल” नावाची बोट समुद्रात उलटली. या बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती असून, सध्या प्राथमिक तपासात तेरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 21 प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात बचाव पथकांना यश आले […]Read More
पंजाब, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंजाबमधील कर्नालमध्ये एका ७० वर्षांच्या आजोबांनी ७३ वर्षीय आजीला घटस्फोट दिला आहे. लग्नाच्या 44 वर्षानंतर या जोडप्याचा घटस्फोट झाला. आजोबांना आजीला 3 कोटींपेक्षा जास्त रकमेची पोटगी द्यावी लागली आहे. एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था करण्यासाठी आजोबांनी आपली शेतजमीनही विकली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मध्यस्थी केंद्रात हा निर्णय घेण्यात आला. ML/ML/PGB […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे येत असताना बीड शहराजवळील लक्ष्मी चौक येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून चाटे याला अटक […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :”विंदांचे गद्यरूप” या समीक्षात्मक पुस्तकासाठी २०२४ चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना बुधवार, १८ डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे. हजारो प्रतिभावान विद्यार्थी घडविणारे मराठी भाषेचे शिक्षक व मराठी वाङ्मयात ‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ निर्माण करणारे तपस्वी अशी त्यांची ओळख आहे. डॉ. सुधीर रसाळ यांना हा पुरस्कार जाहीर […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपट नॉमिनेट झाल्याने सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण, किरण राव दिग्दर्शित’लापता लेडीज’ ९७ व्या ऑस्कर पुरस्कार २०२५ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ‘लापता लेडीज’ बाहेर पडला असला तरी भारताच्या अजून आशा संपलेल्या नाहीत. […]Read More
राधिका अघोर स्थलांतर, ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. माणसाचा विकास आणि पृथ्वीची ओळख जसजशी होऊ लागली, तसतसे माणसांचे स्थलांतर सुरु झाले. कधी कामांसाठी, कधी कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, तर कधी उत्तम संधी शोधत मानवानं कायम स्थलांतर केलं आहे. महायुद्ध, फाळणी किंवा यादवी युद्ध यामुळेही अलीकडच्या काळात. मोठी स्थलांतरं झाली आहेत. स्थलांतरितांना मानवी हक्क न मिळणं, किंवा स्थलांतरितांचा […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 16 डिसेंबरपासून हे बदल तात्पुरत्या स्वरुपात लागू करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेने काही लोकल गाड्यांच्या वेळेत आणि थांब्यांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या या बदललेल्या वेळापत्रकानुसार अंधेरी-विरार […]Read More
दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा हा नवा विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मु पो बोंबिलवाडी’ या मल्टी स्टारर चित्रपटाचे ट्रेलर रिलिज निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकारांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडले. प्रशांत दामले, वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर असे दमदार […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणार्या जोडप्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत १३ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. त्यात काल शासनाने सुधारणा केली.या सुधारित परिपत्रकानुसार अशा जोडप्यांना सुरक्षा देण्याबाबत करण्यात येणार्या उपाय योजना स्पष्ट केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना देण्यात […]Read More