mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

10वी, 12 वी परीक्षांबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र बोर्डाकडून प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा पहिल्यांदाच बाह्य परीक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे. खासगी किंवा विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना सरकारी अनुदानित शाळांमध्ये, तर अनुदानित शाळांमधील शिक्षकांना खासगी शाळांमध्ये बाह्य परीक्षक म्हणून नियुक्त केले जाणार आहे. हा बदल परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष बनवण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

पुण्यात इच्छुक उमेदवाराने खाल्ला ‘एबी फॉर्म’

पुणे, दि. 31 : राज्यभर होऊ घाललेल्या पालिका निवडणूकीच्या उमेदवारीसाठी रस्सीखेची सुरू आहे. उमेदवारीची आस लावून बसलेले कार्यकर्ते तिकीट न मिळाल्याने नाराज होत आहेत. पुण्यात अशाच एका नाराज इच्छुक उमेदवाराने चक्क प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म खाल्ला आहे. धनकवडी-सहकारनगर परिसरात ही नाट्यमग घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक ३६ (अ) मध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन दावेदारांमध्ये उमेदवारीवरून वाद […]Read More

महानगर

BMC निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती

मुंबई, दि. ३१ : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल यांची मुख्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले इक्बाल सिंग चहल यांनी मे २०२० पासून जवळपास चार वर्षे मुंबई महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

जर्मनीच्या बँकेतून ₹290 कोटींची चोरी

बर्लिन, दि. 31 : जर्मनीतील गेल्सेंकिर्चेन शहरातील स्पार्कस बँकेत तब्बल २९० कोटी रुपयांची चोरी झाली. चोरट्यांनी पार्किंग गॅरेजच्या भिंतीतून मोठे भगदाड पाडून थेट तिजोरीपर्यंत प्रवेश केला आणि ३,२५० पेक्षा जास्त लॉकर फोडून रोकड व दागिने लंपास केले. ही घटना ख्रिसमस सुट्टीत घडली, जेव्हा परिसर शांत होता. चोरीचा उलगडा २९ डिसेंबरला फायर अलार्म वाजल्यानंतर झाला. तपासात […]Read More

महानगर

संजय राऊत यांच्या घरी बॉम्बनाशक पथक दाखल

मुंबई, दि. ३१ : मुंबई मनपाच्या निवडणूकीसाठी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून आजारपणातून उठून सक्रीय झाले आहेत. मुंबईत ठाकरे गट आणि मनसे युती घडवण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान आज भांडुपमधील संजय राऊत यांच्या घराबाहेर एक संशयित गाडी फिरताना आढळली. संजय राऊत यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या एका […]Read More

देश विदेश

सोशल मीडियावरील अश्लील कंटेंटबाबत केंद्राचा इशारा

नवी दिल्ली, दि. ३० : केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अश्लील सामग्रीबाबत इशारा दिला आहे. यात म्हटले आहे की कंपन्यांनी अश्लील, असभ्य, पोर्नोग्राफिक, मुलांशी संबंधित लैंगिक शोषणाचे आणि इतर प्रकारच्या बेकायदेशीर सामग्रीवर त्वरित बंदी घालावी. जर कंपन्यांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर खटला चालवला जाईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Meity) ही सल्लागार सूचना […]Read More

बिझनेस

संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी

नवी दिल्ली, दि. ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती देत संरक्षण क्षेत्रासाठी 79,000 कोटी रुपये रुपयांच्या खरेदी प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ देशाच्या सीमा अधिक सुरक्षित होणार नसून, भारतीय संरक्षण कंपन्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नवीन संरक्षण खरेदी नियमावलीनुसार (DPM), […]Read More

ट्रेण्डिंग

फक्त 1850 रुपयांमध्ये विमान प्रवास, Air India Express ची ऑफर

मुंबई, दि. 30 : Air India Express ने प्रवाशांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली. कंपनीने त्यांचा मासिक “पे डे सेल” सुरू केला आहे. या सेल अंतर्गत देशांतर्गत प्रवाशांसाठी विमान तिकिटे १,९५० रुपयांपासून सुरू होतात, तर परदेशात प्रवास करण्याची योजना आखणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय तिकिटे ५,५९० रुपयांपासून सुरू होतील. या विशेष भाड्यांवरील तिकिटे १ जानेवारी २०२६ पर्यंत एअरलाइनच्या अधिकृत […]Read More

महानगर

३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस

मुंबई, दि. ३० : मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयात १९९२ साली घडलेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा खटला आता ३३ वर्षांच्या विलंबानंतर पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने दोन आरोपींच्या विरोधात अतिरिक्त पुराव्यांची नुकतीच नोंद करून घेतली आहे. फारुख मन्सुरी ऊर्फ फारुख टकला आणि त्रिभुवन रमापती सिंह ऊर्फ श्रीकांत राय या दोन आरोपींविरूद्ध अतिरिक्त […]Read More

ट्रेण्डिंग

गुजरातमध्ये स्थापन होणार Indian AI Research Organisation

अहमदाबाद, दि. ३० : गुजरातमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाला नवे बळ मिळणार आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गिफ्ट सिटी येथे “इंडियन एआय रिसर्च ऑर्गनायझेशन” (IAIRO) स्थापन करण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या संस्थेची उभारणी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स (IPA) यांच्या त्रिपक्षीय भागीदारीत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलवर करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश […]Read More