mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला ATS ने केली अटक

पुणे दि ५– संगणक आणि लॅपटॉप रिपेरिंग करणारा पुण्यातील ताडीवाल रोड वस्तीतील रहिवासी प्रशांत कांबळे कबीर कला मंचच्या संपर्कात आला. नोव्हेंबर १५, २०१० रोजी मुंबईला कामानिमित्त जातो असे सांगून तो घरातून निघून गेला, मात्र परत आलाच नाही. त्याच्या कुटुंबाने १८ जानेवारी २०११ रोजी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे मिसिंग रिपोर्ट दाखल केला. ATS ने २०११ दरम्यान […]Read More

राजकीय

वन डिस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन सुविधा देण्यास सुरुवात

पुणे दि. ४ :– राज्यात “वन डिस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन” ही योजना अंमलात आणण्यात आली असून, नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात कुठल्याही उपनोंदणी कार्यालयात मालमत्तेची नोंदणी करता येणार आहे. राज्यभरातील नागरिकांना ही योजना दिलासा देणारी ठरणार आहे. यापुढे एकाच जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयात नोंदणी करता येणार असल्यामुळे वेळ आणि कागदपत्रांचा त्रास टळणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. […]Read More

आरोग्य

महाराष्ट्रातील १०३ दिव्यांगांना ‘दगडूशेठ’ च्या वतीने कृत्रिम अवयव

पुणे दि ४:– श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले. सणस मैदानासमोरील सजावट विभागात राज्यातील १०३ दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात आले. साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठातील स्वित्झर्लंड येथील शास्त्रज्ञ […]Read More

राजकीय

रिपब्लिकन पक्ष आता सिक्कीम राज्यात

मुंबई, दि.4रिपब्लिकन पक्षाची आज सिक्कीम राज्यात स्थापना करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली. सिक्कीम मधील रँग्पो शहरात आज रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या सिक्कीम राज्य कार्यकारिणी ची अधिकृत निवड ना.रामदास आठवले यांनी जाहीर केली.यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या सिक्कीम राज्य कार्यकारिणी […]Read More

शिक्षण

बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर

मुंबई, दि. ४ :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दि. ५ मे, २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व […]Read More

राजकीय

राम नाईक यांचा मत्स्योद्योग समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई दि ४– महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या सरकारी समितीच्या अध्यक्षपदाचा उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. जानेवारी 2025 पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे राम नाईक यांना तीनदा दीर्घकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता प्रकृति स्थिर असली, तरी अजूनही संपूर्ण विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला असल्याने […]Read More

पर्यावरण

चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वारा आणि गारपीट

चंद्रपूर दि ४:- मागील काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात कमालीची वाढ झालेली होती. या वातावरणात मागील दोन दिवसांपासून अचानक बदल झाला असून आज दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीटी चा वर्षाव झाला. या गारपीटी मुळे आंबा आणि पालेभाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.Read More

सांस्कृतिक

बेलवंडी कोठार बारव संवर्धनासाठी शिवदुर्गवीर सरसावले ….

अहिल्यानगर दि. ४–“महाराष्ट्र बारव मोहिम” अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन आणि शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी कोठार येथील ९०० वर्षापूर्वीच्या पुरातन बारवची सलग दुसऱ्या आठवड्यात श्रमदान मोहीम राबविण्यात आली. ही ४७ वी स्वच्छता श्रमदान मोहीम होती.यामध्ये १३ शिवदुर्ग सदस्यांनी सहभाग नोंदवला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वारसा […]Read More

राजकीय

नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार, राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल

परभणी, दि. ४ —भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच नृसिंह अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि राक्षसरुपी भाजपाचे […]Read More

मनोरंजन

महात्मा फुले यांच्या जीवनावरील सिनेमा टॅक्स फ्री करा.

मुंबई, दि. 4महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील फुले सिनेमा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक सिनेमा आहे. देशभरात नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती मिळणे आवश्यक आहे.जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे.त्यासाठी फुले चित्रपट हा देशभरात टॅक्स फ्री झाला पाहिजे […]Read More