mmcnews mmcnews

राजकीय

जिल्हा गडचिरोलीत अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा कार्यशाळा संपन्न

गडचिरोली प्रतिनिधीराष्ट्रमाता आणि भारतीय स्त्रीशक्तीचे सर्वोच्च प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने सर्किट हाऊस (शासकीय विश्रामगृह), गडचिरोली येथे भव्य जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री व खासदार मा. डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थिती लावली. त्यांनी आपल्या प्रभावी […]Read More

ट्रेण्डिंग

करमुक्त भारत चित्रपटाद्वारे कर प्रणालीला विरोध

सर्व कर मालमत्तांवर वर्षातून एकदाच कर लावण्याची सूचना करीत व्यापारी समुदायाने कर प्रणालीला जोरदार विरोध केला आणि करमुक्त भारताची मागणी केली. व्यापारी सुबोध जयप्रकाश यांनी त्यांच्या करविषयक समस्यांवर सर्जनशील ‘करमुक्त भारत’ हा चित्रपट बनवला, या विषयी अधिक माहिती देण्यासाठी आज मुंबईत प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील सामान्य उद्योजक सुबोध जयप्रकाश […]Read More

महानगर

वरळी बीडिडी चाळीत पावसामुळे घरात गळती

मुंबई प्रतिनिधीवरळी बीडीडी चाळींच्या गच्चीवर डांबरीकरण व शालिमार, पॉलिमर प्लास्टर न टाकल्यामुळे जोरदार पडलेल्या पावसामुळे बीडीडी चाळीच्या गच्चीवरून गळती सुरू झाली, त्यामुळे ३ऱ्या मजल्यावरील रहिवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागला. तसेच घरटनपावसाचे पाणी शिरल्यामुळे अनेक लोकांच्या विविध वस्तूंचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आज आमदार आदित्यजी ठाकरे आणि आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वरळीतील सार्वजनिक […]Read More

कोकण

महाड दापोली स्पीड ब्रेकर मुळे झाला एसटी बसचा अपघात

महाड प्रतिनिधीमहाड दापोली रस्त्यावर. शिरगाव ग्रामपंचायत च्या हद्दीमध्ये हॉटेल हिल टाऊन जवळ रस्त्यावर टाकलेल्या स्पीडब्रेकर मुळे खेड बोरवली एसटी बसला अपघात झाला सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे. महाड दापोली राज्य मार्गावर खेड बोरवली MH. २०.BL.२२४२ ही बस शिरगाव गावाजवळ असणारा हिल टाउन हॉटेल जवळ आली असता […]Read More

राजकीय

परिवहन विभागातील जागांचा पीपीपी तत्वावर विकास

मुंबई, दि. २२:- परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या ४३ जागांपैकी मुंबईतील ४ मोक्याच्या जागा अनाधिकृत रित्या बळकावण्यात आलेल्या आहेत. तसेच १५ ठिकाणी परिवहन कार्यालय ही भाड्याच्या जागेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात उर्वरित जागा देखील गिळंकृत होऊ नयेत यासाठी परिवहन विभागाने या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ते परिवहन […]Read More

कोकण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, पावसाचा जोर कायम

सिंधुदुर्ग दि २२– उत्तर कर्नाटक गोवा किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढवल्यास जिल्हा प्रशासन अलर्ट असल्याचं जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले. दरम्यान सिंधुदुर्ग […]Read More

महानगर

परळसह १०३ पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई दि २२– अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित परळ रेल्वे स्थानकासह देशातील १०३ पुनर्विकसित रेल्वे स्थानकांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिकानेर राजस्थान येथुन ऑनलाइन उपस्थितीत आज संपन्न झाला. यानिमित्त मध्य रेल्वेतर्फे मुंबईतील पुनर्विकसित परळ स्टेशन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. […]Read More

क्रीडा

मुंबईकर खेळाडूच्या नेतृत्त्वाखाली भारताचा U-19 संघ जाहीर

मुंबई, दि. २२ : भारताचा 19 वर्षांखालील क्रिकेट संघ लवकरच इंग्लंडचा दौरा करणार आहे. यासाठी BCCI ने संघ जाहीर केला आहे. IPL 2025 मध्ये CSKकडून खेळलेल्या आयुष म्हात्रेकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. आयपीएलमध्ये 35 चेंडूत शतक झळकावणाऱ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान देण्यात आले आहे. गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात बीसीसीआयने म्हटले आहे की, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

चंदगड मतदार संघात एसटी बसेस वाढवा

मुंबई प्रतिनिधीचंदगड मतदारसंघाला लागूनच कर्नाटक आणि गोवा राज्य असून या भागात सर्वसामान्य लोकांना दळणवळणासाठी उपलब्ध असणारी हक्काची सेवा देणारी’लालपरी’ म्हणजे ‘एस टी बस. एसटी बसेस ची आमच्या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. चंदगडमधील बहुतांशी जनता, शाळकरी मुले हे एस. टी. सेवेवरच अवलंबून आहेत. पण आगाराकडे एस. टी. बसेसची परंतु एस टी बसेसची कमतरता असल्याने […]Read More

ट्रेण्डिंग

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू; 23 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट…

रत्नागिरी दि २२:– रत्नागिरी जिल्ह्यात सर्व ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे अंतिम टप्प्यातील आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह आणि वादळीवाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी 50 ते 60 […]Read More