mmcnews mmcnews

महानगर

गोमाता चारणाऱ्या महिलांची होते उपासमार

मुंबई, दि.२५भाजपा सरकार हे हिंदुत्ववादी सरकार असल्याचे वारंवार बोलले जाते.परंतु या सरकारमध्ये गोमाता सलामणाऱ्या सेविकांना उपासमारीची वेळ आली आहे. शासन पोलिस पालिका एकमेकाकडे बोट दाखवत असल्याने गोमाता सेवकांनी पोलीस कमिशनर ऑफिस समोर तीव्र आंदोलन करत सरकारचा निषेध केला.मुंबई व मुंबई परिसरातील मंदिरासमोर गाय घेऊन भक्तांच्या दर्शनासाठी कार्यरत असणाऱ्या अनेक नाथपंथी गोसावी सेविका न्याय मागण्यासाठी आक्रमक […]Read More

ट्रेण्डिंग

जालनाच्या भोकरदन तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी….

जालना दि २५– पावसाचा जोर अधिक असल्याने सोयगाव देवी येथे नदीला आला पूर, सोयगावदेवी येथे पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे. जालनाच्या भोकरदन तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावलीय. भोकरदन तालुक्यातील सोयगावदेवी, बेलोरा आणि वालसा गावात मुसळधार पाऊस झालाय. पावसाचा जोर अधिक असल्याने सोयगावदेवी येथे नदीला पूर आला आहे. आणि हे पाणी आता पुलाच्या […]Read More

पर्यावरण

मान्सून अखेर केरळात दाखल

मुंबई, दि. २५ : अखेर मान्सून केरळात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात घोषणा केली आहे. यंदा लवकरच मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. २४ तासात मान्सून केरळात दाखल होणार असल्याचं अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात होता. मात्र त्यापूर्वीच मान्सूनने केरळात हजेरी लावली आहे. यापूर्वी २००९ आणि २००१ मध्ये मान्सून […]Read More

विदर्भ

७८ वर्षांची प्रतीक्षा संपली, गावात पहिल्यांदाच पोहोचली एसटी बस..

गडचिरोली दि २५:– स्वातंत्र्यानंतर तब्बल ७८ वर्षांनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कटेझरी गावात एसटी बसचा पहिला प्रवास झाला. गडचिरोली पोलिस दलाच्या प्रयत्नातून आणि राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने ही ऐतिहासिक सेवा सुरू झाली. गावात बस येताच नागरिकांनी वाजतगाजत स्वागत केलं आणि गावात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं. गडचिरोली जिल्ह्यातील कटेझरी गावात, जिथे इतिहास घडला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इथं […]Read More

ट्रेण्डिंग

एमआयडीसीतील वीज पुरवठा खंडित, उद्योगांना कोट्यावधीचा फटका

चंद्रपूर दि २४ :– चंद्रपूरात ताडाळी एमआयडीसी परिसरातील २०० केव्ही वाहिनीतून जादा वीज मिळविण्यासाठी एका कंपनीने जेसीबी मशीनद्वारे खोदकाम केले. या खोदकामात महावितरणच्या ३३ केव्ही केबलचे प्रचंड नुकसान केले. यामुळे वीजपुरवठा बंद होऊन एमआयडीसीतील उद्योग ठप्प झाले. उद्योगांचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. महावितरणलाही २२ लाखांचा फटका बसल्याने कंपनीला नोटीस बजावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एमआयडीसीमध्ये […]Read More

महानगर

माजी नगरसेविका सुजाता सानप यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुंबई प्रतिनिधी शिवसेना ऊबाठाच्या फोर्ट येथील माजी नगरसेविका सुजाता सानप यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तगिरी बंगला येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना कुलाबा विधानसभा संघटक गणेश सानप ह्यांनी देखील प्रवेश केला. आमच्या पक्षात आमची घुसमट होत होती. तसेच आम्हाला कुठे तरी न्याय मिळत नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याची […]Read More

मराठवाडा

अवकाळीचा कांदा, कोथिंबीर आणि टरबूज पिकाला तडाखा…

लातूर दि २४:– लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसाचा फळबागांना आणि पालेभाज्यांना तडाखा बसलाय. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील एका शेतकऱ्याच्या तीन एकर शेतातील टरबूज पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शिरुर अनंतपाळ येथील एका शेतकऱ्याच्या तीन एकरातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रेणापूर […]Read More

क्रीडा

शुभमन गिल भारताचा नवा कसोटी क्रिकेट कर्णधार

मुंबई, दि. २४ : भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी युवा सलामीवीर शुबमन गिल याची नियुक्ती करण्यात आली आहे. BCCI निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्याआधी कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. आगरकर यांनी शुबमन गिल याचं कर्णधार […]Read More

कोकण

राज्याच्या किनारपट्टीवर समुद्र खवळलेलाच, सावधानतेचा इशारा

सिंधुदुर्ग दि २३– पश्चिम किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पूर्वमध्य अरबी समुद्र आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर, कोकण-गोवा किनाऱ्यावर आणि त्याच्या बाहेर ४०-५० किमी प्रतितास ते ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहत आहेत. २४ आणि २५ मे रोजी पूर्वमध्य अरबी समुद्र आणि कोकण, गोवा आणि लगतच्या दक्षिण गुजरात किनाऱ्यावर ४५-५५ किमी […]Read More

महानगर

पावसाळ्यापूर्वी म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतीच्या दुरुस्तीला गती

मुंबई, दि. २३ :- आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळ (म्हाडा) यांना उद्देशून पाठवलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या पत्राद्वारे मंत्री लोढा यांनी म्हाडाकडे मागणी केली होती की, उपकर प्राप्त […]Read More