mmcnews mmcnews

राजकीय

कासारवडवली उड्डाणपुलाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे दि ८ठाणे कासारवडवली उड्डाणपूलाचा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला असून,आज ठाणे जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माझ्या हस्ते पार पडले. याचा मला सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले. ते या उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.मंत्री सरनाईक म्हणाले, लोकप्रतिनिधी या नात्याने घोडबंदर, गायमुख, कासारवडवली परिसरात […]Read More

महानगर

राज्यपालांकडून यापुढे मराठी पत्रव्यवहाराला मराठीतून उत्तर

मुंबई दि ८ — संसदीय राजभाषा समितीच्या ९ सदस्यांनी समितीचे निमंत्रक खा. डॉ दिनेश शर्मा (उ.प्र.) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची आज राजभवन मुंबई येथे भेट घेतली व समितीच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली. देशातील प्रादेशिक भाषांना चालना देणे व हिंदी भाषेला ‘सहयोगी भाषा’ म्हणून प्रस्थापित करणे या उद्देशाने समिती काम करीत असल्याचे […]Read More

राजकीय

स्वस्त वीज मिळवणे राज्याला बंधनकारक….

मुंबई दि ८ — राज्यातील वीजपुरवठा तासागणिक स्वस्त दराने घेण्याची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली , तसे बंधन घालण्यात आलं आहे, त्यामुळं औष्णिक वीज उत्पादन महाग पडते , म्हणून नवीन औष्णिक वीज संच उभारणे शक्य नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली. याबाबतचा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. परळी येथे […]Read More

ट्रेण्डिंग

देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीमध्ये मोठी घट

मुंबई, दि. ७ : २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत तब्बल २० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. प्रॉपर्टी सल्लागार संस्था अ‍ॅनारॉक (Anarock) च्या ताज्या अहवालानुसार, एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत देशभरात एकूण ९६,२८५ घरे विकली गेली, तर मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या १,२०,३३५ इतकी होती. ही घट देशातील रिअल […]Read More

ट्रेण्डिंग

ऑनलाइन मराठी शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागात यावर्षीच्या संवादात्मक मराठी अभ्यासक्रम स्तर १ चे वर्ग (प्रारंभिक अभ्यासक्रम) रविवारपासून सुरू झाले आहेत. हा अभ्यासक्रम रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत एक वर्षासाठी ऑनलाइन पद्धतीने शिकवला जातो. या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागामार्फत काही वर्षांपासून ऑनलाइन प्रत्यक्ष संवादात्मक मराठी अभ्यासक्रम राबविले […]Read More

महानगर

डेटींग ऍपमुळे वृद्धाने गमावले तब्बल ७३ लाख

नवी मुंबई,दि. ७ : वयाच्या ६२ व्या वर्षी एका वृद्धाला डेटिंग अ‍ॅपवर डेट करणं चांगलंच महागात पडलं आहे. या वृद्धाची एका महिलेने तब्बल ७३.७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ही घटना न्यू पनवेलमध्ये घडली असून या महिलेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, मार्च ते मे २०२४ या काळात […]Read More

राजकीय

किन्नर उपचारासाठी स्वतंत्र कक्षाचा प्रश्न मार्गी लागणार.

मुंबई, सोमवार, दिनांक ७/७/२०२५ रोजीराज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मा. श्री. प्रकाशजी आबिटकर यांची आज विधान परिषद सदस्य मा. आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत किन्नर (ट्रान्सजेंडर) समुदायासाठी राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष (वाॅर्ड) स्थापन करण्याबाबत महत्वपूर्ण विषय उपस्थित करण्यात आला.या चर्चेदरम्यान, ठाणे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार […]Read More

ट्रेण्डिंग

वर्ध्यात खादीच्या कापडापासून T-Shirt निर्मिती

वर्धा, दि. ७ : महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित वर्ध्यातील मगन संग्रहालय समितीने खादीच्या कापडापासून टी-शर्ट तयार करण्याचा देशातील पहिलाच यशस्वी प्रयोग केला आहे. पारंपरिक खादीला आधुनिकतेची जोड देत, या उपक्रमाने खादीला नव्या पिढीमध्ये लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे. देशी कापूस, सेंद्रिय शेती, नैसर्गिक रंग आणि गांधीवादी विचारांचा संगम असलेली ही निर्मिती सध्या चर्चेचा विषय ठरली […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

म्हशी घेण्यासाठी वडीलांनी साठवले ५ लाख, मुलाने उडवले गेममध्ये

कोल्हापूर, दि. ७ : जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबात अलीकडेच एक धक्कादायक घटना घडली. या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी, विशेषतः दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी, तब्बल सात लाख रुपये साठवले होते. त्याच्या मनात एकच स्वप्न होतं — एक चांगली म्हैस विकत घेऊन नियमित दूध विक्री करून उत्पन्नाचा स्थिर स्रोत निर्माण करायचा. मात्र, त्याच्या सहावीत […]Read More

विज्ञान

डासांपासून मुक्तीसाठी आंध्रप्रदेशने घेतली AI ची मदत

अमरावती, दि. ७ : आंध्र प्रदेश सरकारने डासांमुळे होणाऱ्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक अभिनव तंत्रज्ञानाधारित उपक्रम सुरू केला आहे. ‘स्मार्ट मच्छर देखरेख प्रणाली (Smart Mosquito Surveillance System – SMoSS)’ असे या प्रकल्पाचे नाव असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन आणि IoT सेन्सरच्या मदतीने डासांची संख्या, प्रजाती, हवामान स्थिती आणि संसर्गजन्य रोगांचा प्रसार यावर लक्ष ठेवले जाणार […]Read More