बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

 बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

पुणे, दि २७: तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमे निमित्त ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे’ यांच्या वतीने १ ते ३ मे २०२६ दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रयमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमा दरम्यान भव्य खिरदान वाटपही करण्यात येणार आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष व पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.

पुढे बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले, ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या या उपक्रमाचे यंदा 20 वे वर्ष आहे. या अंतर्गत येत्या शुक्रवारी, दि. १ मे २०२६ रोजी पहाटे ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन येथे बुद्ध-धम्म गीतांचा ‘मंगलमय पहाट’ हा कार्यक्रम होणार आहे. चेतन चोपडे यांच्या संकल्पनेतून ‘तुझ्या पाऊलखुणा भीमराया’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर होणार असून, विकास साळवे, चेतन चोपडे आणि स्नेहल प्रधान यांचा यामध्ये सहभाग असणार आहे.
तसेच, बौद्ध पौर्णिमेनिमित्त शनिवार, दि. २ मे आणि रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘बुद्ध-धम्म संध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तथागत गौतम बुद्ध विहार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जोशी गेट येथे होणार आहे. यामध्ये २ मे रोजी सिने कलाकार तसेच युवा संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायक भाग्यश्री अंधारे, संतोष मोरे आणि निखिल महाडे हे बुद्ध – भीम गीते सादर करणार आहेत. तर ३ मे रोजी अशोक गायकवाड आणि त्यांच्या टीमकडून ‘रथ भीमाचा हा नेऊ पुढे’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे, असे परशुराम वाडेकर यांनी सांगितले.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *