मुंबई, दि. २६ :– महायुती सरकार तीन कोटी १७ लाख मते आणि ५१.७८ टक्के मताधिक्याने निवडून आले आहे. अशा मजबूत सरकारला उलथवण्याची भाषा चीड आणणारी आहे, असे सांगत महाराष्ट्र वैयक्तिक टीका कदापि सहन करणार नाही, खपवून घेतली जाणार नाही, अश्या शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना ठणकावले. […]Read More
कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे सुरू असलेल्या १६व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने चमकदार कामगिरी केली आणि ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदके जिंकली. पदकतालिकेत भारताने २८ सुवर्ण, १० रौप्य आणि १२ कांस्य पदकांसह स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. महिलांच्या ट्रॅप स्पर्धेत भारताने वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही प्रकारात सुवर्णपदके जिंकली. नीरू धांडाने वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक […]Read More
हंसलपूर, दि. २६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील हंसलपूर येथे मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ‘ई-विटारा’ला हिरवा झेंडा दाखवून तिच्या उत्पादनाचा औपचारिक शुभारंभ केला. ही कार पूर्णतः भारतात तयार करण्यात आली असून, युरोप, जपानसह १०० हून अधिक देशांमध्ये तिची निर्यात केली जाणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड्सच्या स्थानिक उत्पादनासाठी नवीन असेंब्ली […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ : जामनगर (गुजरात) येथील वनतारा ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन सेंटरविरोधातील गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. रिलायन्स फाउंडेशनच्या अंतर्गत सुरू झालेल्या या प्रकल्पावर प्राण्यांची बेकायदेशीर खरेदी, स्थलांतर, आणि त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचे आरोप झाले आहेत. याशिवाय, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन आणि आंतरराष्ट्रीय वन्यजीव […]Read More
मुंबई, दि. २६ : MPSC द्वारे घेतली जाणारी प्रत्येक परीक्षाच काही ना काही कारणास्तव चर्चेत येत असते. गोंधळ घालण्यासाठीच प्रसिद्ध असलेल्या या आयोगाने आता एक नवीनच विक्रम केला आहे. आयोगाने गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (मुख्य) परीक्षा–२०२४ ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करताना तब्बल १२ प्रश्न रद्द केले आहेत. तर दोन प्रश्नांचे पर्याय बदलले आहेत. एकूण १४ […]Read More
वॉशिग्टन डीसी, दि. २६ : अमेरिकन सरकारने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त २५% कर लादण्याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. दंड म्हणून लावण्यात आलेला हा कर भारतीय वेळेनुसार २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३१ वाजल्यापासून लागू होईल. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट रोजी हा कर जाहीर केला. यापूर्वी व्यापार […]Read More
मुंबई, दि. २६ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेता दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याचा प्रश्न पुन्हा पेटला असून आता हा मुद्दा न्यायालयात गेला आहे. केंद्र सरकारकडून होत असलेल्या विलंबाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे की, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यायचे ठरवले आहे की […]Read More
मुंबई, दि. २६ : मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. 29 ऑगस्ट रोजी जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येण्याचा निर्धार केला असून हजारो समर्थकांसह ते मुंबईत आझाद मैदानावर पोहोचून उपोषण चालू करणार आहेत.आज (26 ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षण आणि त्यासाठी चालू असलेल्या प्रक्रियेबाबत […]Read More
मुंबई, दि. २६ :– महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठाशी संबंधित पुरविण्यात येणाऱ्या ५६ अधिसूचित सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्रालयात लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या विद्यापीठाशी संबंधित सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याबाबत बैठक […]Read More
मुंबई, दि २६~ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित व्यापक रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी तसेच बदलत्या काळात रिपब्लिकन पक्षाची वाटचाल मजबूत करण्यासाठी साहित्यिक आणि विचारवंतांशी विचार मंथन करून पुढील वाटचालीचे दिशादर्शन करण्यासाठी येत्या दिनांक 27 आणि 28 ऑगस्ट रोजी महाबळेश्वर मध्ये रिपब्लिकन पक्षाचे विचारमंथन शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]Read More