पिंपरी, दि ३ :छायाचित्रकार हा एक समाजातील वास्तव मांडणारा चौकस बुद्धीचा उत्कृष्ट कलाकार असतो. वृत्तपत्र छायाचित्रकार समाजातील दुःख, वेदना आणि आनंद जनतेपर्यंत अविरत पणे पोहोचवतो. त्यांच्यामुळेच समाजातील वास्तव पुढे येत असते. असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.गणेशोत्सवानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे फेस्टीव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने […]Read More
मुंबई, दि. ३ — बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री […]Read More
मुंबई, दि ३ : (सामाजिक न्याय विभाग)संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात १ हजार रुपयांची वाढलाभार्थ्यांना दरमहा दीड हजार ऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार (ऊर्जा विभाग)महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबतचे धोरण निश्चित (कामगार विभाग)महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा (कामगार विभाग)कारखाने अधिनियम, १९४८ मध्ये […]Read More
मुंबई दि ३– राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याची धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते. त्यानुसार २१ ऑगस्ट पासून अटल सेतू सह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात […]Read More
मुंबई दि.2 ~ मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा महाराष्ट्र राज्य सरकार चा निर्णय ऐतिहासिक आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुमिका अत्यंत स्वागतार्ह असून मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या इतिहासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे पाठीराखे ठरले आहेत.मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करीत असल्याची […]Read More
छ. संभाजीनगर दि ३– मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दीर्घकाळ उपोषणा केल्यामुळे त्यांची तब्येत खालावल्याने मंगळवार–बुधवारी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांच्या तपासण्या सुरू केल्या असुन किमान पंधरा दिवस उपचारांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे. अपेक्षित गर्दीचा अंदाज घेत पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात […]Read More
चंद्रपूर दि ३:– निम्न वर्धा धरणातून रात्री पाणी सोडल्यामुळे चंद्रपूर शहरातील नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रात्री रहमतनगर येथील सहा ते सात कुटुंबांना मनपाच्या शाळांमध्ये हलविण्यात आले. रहमतनगर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, मोहम्मदिया नगर आणि भिवापूर वॉर्ड येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, मनपाच्या शाळांमध्ये आश्रय घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. इरई धरणाचे सर्व […]Read More
मुंबई, दि. २ : राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं असून आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान मुंबईतील आंदोलन संपल्यानंतर आणि मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माझ्यावर टीका झाली तरी मी जराही विचलित झालो नाही, कारण […]Read More
नवी दिल्ली, दि. २ : भारताची पहिला स्वदेशी विक्रम मायक्रोप्रोसेसर चीप केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेमिकॉन इंडिया 2025(Semicon India )या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केली. दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया २०२५ चे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थिती होत्या. ‘विक्रम’मध्ये ३२-बिट मायक्रोप्रोसेसरआणि चार मंजूर प्रकल्पांचे चाचणी […]Read More
मुंबई, दि. २ : मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आज यश मिळाले असुन त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करत सरकारने आज महत्त्वपूर्ण जीआर लागू केला आहे. त्यामध्ये सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट यांच्या संदर्भ महत्त्वाचा ठरला आहे. याबाबत तपशिलवार माहिती जाणून घेऊया. सातारा जिल्ह्यातील काही मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून असू शकतात, ज्याचा उपयोग मराठ्यांना […]Read More