mmcnews mmcnews

राजकीय

अजित पवार दादागिरी प्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे

सोलापूर दि ५– राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिस्तप्रिय नेते म्हणून ओळख असलेल्या अजित पवारांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यास फोनवरुन दादागिरी केली.पवारांच्या या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे, अखेर अजित दादांना अडचणीत आणणाऱ्या कुर्डू येथील 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल […]Read More

पर्यटन

कास पुष्प पठाराच्या हंगामाचा शुभारंभ

सातारा दि ५– जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पठाराच्या पर्यटन हंगामाचा शुभारंभ झाला असून देशभरातील पर्यटक आता कास येथे येण्यास सुरुवात झाली आहे. निसर्गाने आपल्या हाताने इथे रंगांची मुक्त उधळण केली आहे. कास पठारावर सर्वत्र विविध फुलांच्या रंगछटा पसरल्या आहेत. यामध्ये तेरडा, चवर, गेंद, सीतेची आसवे, नीलिमा, आभाळी, भारंगी यासह तुरळक प्रमाणात टोपली कारवी या फुलांचा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

तळेरे गगनबावडा घाट आठ दिवस वाहतुकीसाठी बंद

सिंधुदुर्ग दि ५ — सिंधुदुर्गला कोल्हापूरशी जोडणाऱ्या तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जी या महामार्गावरील गगनबावडा घाट येथे गुरुवारी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरड हटवण्याचे काम त्वरित हाती घेण्यात आले आहे. परंतु घाटात वरील बाजूला खडकांना उभे तडे गेले आहेत. त्यामुळे त्या खडकांचे सैलकरण करणे गरजेचे आहे. […]Read More

राजकीय

पाणंद रस्ते,सर्वांसाठी घरे योजना अंमलबजावणीसाठी ‘सेवा पंधरवडा’

मुंबई, दि. ४:– महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत विभाग आहे. यातील निवडक विषयांवर मोहीम स्वरुपात काम करुन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा […]Read More

महानगर

शरद पवार गटाचे ठाण्याचे माजी नगरसेवक अमित सरैय्या यांचा समर्थकांसह

मुंबई, 4 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ठाण्याचे माजी नगरसेवक अमित सरैय्या यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ठाण्याचे आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, संजय […]Read More

बिझनेस

GST आकारणीत मोठा बदल, या वस्तू झाल्या स्वस्त

नवी दिल्ली, दि. ४ : भारत सरकारच्या जीएसटी परिषदेनं २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी दरांचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. यामध्ये अनेक दैनंदिन वस्तूंवर कर कमी करून त्या स्वस्त करण्यात आल्या आहेत, तर काही लक्झरी आणि ‘सिन गुड्स’वर कर वाढवून त्या महाग झाल्या आहेत. हे बदल GST 2.0 च्या अंतर्गत करण्यात आले […]Read More

महाराष्ट्र

दररोज 12 तास कामाची परवानगी – कामगार कायद्यात मोठा बदल

मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र सरकारने कामगार कायद्यात मोठा बदल करत दररोज १२ तास काम करण्यास परवानगी देणारे सुधारित नियम जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रात मोठा उलथापाल होण्याची शक्यता आहे. सुधारित कायद्यानुसार, कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आता एका दिवसात १२ तास काम करण्याची परवानगी मिळेल, याआधी ही मर्यादा ९ तास […]Read More

करिअर

देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांची गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, दि. ४ : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF) 2025 ची यादी जाहीर केली असून, देशभरातील उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता आणि कामगिरी यावर आधारित ही रॅंकिंग तयार करण्यात आली आहे. यंदाही भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास (IIT Madras) ने सर्वसाधारण श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे, ज्यामुळे त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि नवप्रवर्तनातील […]Read More

महानगर

मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी दोन नवीन धरणं प्रस्तावित

मुंबई, दि. ४ : मुंबई महानगराच्या वाढत्या लोकसंख्येच्या विचार करुन भविष्यात लागणार्‍या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून दोन नवीन धरणे बांधण्याचा प्रस्ताव आहे.पालघर (Palghar)जिल्ह्यातील पिंजाळ आणि गारगाई नद्यांवर ही दोन धरणे बांधण्याची योजना आहे. पुढील १६ वर्षापर्यंत म्हणजे २०४१ पर्यंत मुंबईकरांना दररोज ६५३५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच पालिकेने आता नवीन […]Read More

राजकीय

कर्जतमधील हलाल टाउनशिप बाबत NHRC कडून सरकारला नोटीस

मुंबई, दि. ४ : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सुकून एम्पायर( Sukoon Empaire Muslim Township) या रिअल इस्टेट प्रकल्पांतर्गत केवळ मुस्लिम (समाजासाठी हलाल लाइफस्टाइल टाउनशिप विकसित केली जात असल्याच्या तक्रारीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेत महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून २ आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश […]Read More