mmcnews mmcnews

पर्यावरण

रेल्वेच्या धडकेने पट्टेरी वाघाचा मृत्यू….

चंद्रपूर दि १४ :– चंद्रपूर जिल्ह्यात चांदा फोर्ट- गोंदिया रेल्वेमार्गावर आणखी एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला आहे, भरधाव रेल्वेच्या धडकेने सिंदेवाही रेल्वे स्थानकाजवळ या वाघाचे आढळले.हिरव्यागार जंगलातून जाणा-या या रेल्वे मार्गावर वारंवार असे वन्यजीवांचे मृत्यू होत आहेत. जय वाघाचा वंश असलेला बिट्टू याचा ताज्या घटनेत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चांदा फोर्ट- गोंदिया […]Read More

ट्रेण्डिंग

कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळाले आंतरराष्ट्रीय मानांकन

मुंबई, दि. १३ : कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. यामुळे कोकणातील पर्यटन जगाच्या नकाशावर ठळकपणे आले आहे. या मानांकनामध्ये रायगड जिल्ह्यातील तीन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली तालुक्यातील लाडघर या दोन किनाऱ्यांना हे मानांकन […]Read More

शिक्षण

दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. १३ : दहावी (SSC)आणि बारावी बोर्डाच्या (HSC) परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावी बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा दोन आठवडे […]Read More

ऍग्रो

राज्यात मंकी पॉक्सचा विषाणूचा प्रवेश

धुळे, दि. १३ : जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा (Monkey Pox) राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात (Dhule) आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने हिरे रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले आहे. मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी […]Read More

अर्थ

Nobel 2025 –अर्थशास्त्रासाठीचे पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम, दि. 13 : रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने आज 2025 चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर केला. यंदाचा पुरस्कार जोएल मोकीर (अमेरिका), फिलिप एघियन (युनायटेड किंगडम) आणि पीटर हॉविट (अमेरिका) यांना प्रदान करण्यात आला आहे. या संशोधनामुळे सरकार, उद्योग आणि शिक्षणसंस्था नवोन्मेषाला चालना देण्यासाठी धोरणे आखू शकतात. आर्थिक विकासासाठी नवोन्मेष किती महत्त्वाचा आहे हे या संशोधनाने […]Read More

राजकीय

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दीपावली सानुग्राह अनुदान जाहीर!

मुंबई दि १३ : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाची ८५ वी बैठक आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील तसेच बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त (कंत्राटी) कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची […]Read More

राजकीय

नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकती, सूचनांसाठी मुदतवाढ

मुंबई, दि. १३ : राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर आता 13 ऑक्टोबरऐवजी 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत […]Read More

पर्यावरण

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, दि. 13 : आठवडाभरापासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा दाखल होणार असल्याची माहिती IMD ने दिली आहे. नैऋत्य मान्सून संपला असला तरी आता महाराष्ट्रात परतीच्या पाऊस हजेरी लावणार आहे. १४ ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल होणार असून किमान १८ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस […]Read More

राजकीय

शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहिण या मुद्द्यांवर सरकारकडून जनतेची फसवणूक

मुंबई, दि. १३ : महायुती सरकारने राज्यातील शेतकरी, लाडकी बहीण, बेरोजगार यांची घोर फसवणूक केली आहे. शेतकरी संकटात असताना त्यांना भरीव मदत देण्याऐवजी जुन्याच योजनांचे एकत्रीकरण करून फसवे पॅकेज जाहीर केले आहे. शेतकरी कर्जमाफीवरही महायुती सरकार बोलत नाही. लाडकी बहीण योजनेतून २१०० रुपये देण्यावर सरकार गप्प आहे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष आंदोलन, मोर्चे काढून […]Read More

शिक्षण

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू

मुंबई, दि. १३ : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक अभियानास दोन वर्षात मोठा प्रतिसाद लाभला आहे. २०२५-२६ मध्ये हे अभियान राबविण्यासाठी ८६.७३ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून सुधारित निकष आणि नवीन उपक्रमांसह या अभियानाचा तिसरा टप्पा राबविण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली. २०२५-२६ या वर्षाकरीता […]Read More