Month: March 2026

सांस्कृतिक

ताडदेव येथे भव्य गडकिल्ले स्पर्धा आणि प्रदर्शन सोहळा

मुंबई, दि ५श्री सह्याद्री प्रतिष्ठान व ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (ताडदेवचा राजा) यांच्या संयुक्त विद्यमाने ताडदेव येथील गोकुळधाम सोसायटी येथील पटांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य गड किल्ले स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ६ मार्च ते ७ मार्च रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत प्रदर्शनासाठी सर्वांना उपलब्ध राहणार आहे. […]Read More

ऍग्रो

पोषक हवामानामुळे गव्हाचे पीक जोमात बहरले. भरघोस उत्पन्नाची अपेक्षा…

जालना दि ५ : जालन्यात पोषक हवामानामुळे गव्हाचे पीक जोमात बहरले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना गव्हाचे भरघोस उत्पादन व चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. रब्बी हंगामात निसर्गाची साथ आणि कडाक्याच्या थंडीमुळे गव्हाचे पीक चांगले जोमात आले आहे. सध्या गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून, शेतात डोलणाऱ्या हिरव्यागार पिकाकडे पाहून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यंदा डिसेंबर आणि […]Read More

सांस्कृतिक

४८ वर्षांनंतर पुरीच्या जगन्नाथाच्या रत्न भंडाराची होणार मोजदाद

पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडाराची मोजदाद आणि यादी बनवण्यासाठी प्रक्रिया अखेर लवकरच सुरू होणार आहे. रत्न भंडार’ हे भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा यांच्या मौल्यवान आभूषणांचा प्राचिन खजिना आहे. हे मंदिर जगमोहन (सभा कक्ष) उत्तर दिशेला आहे. 1978 मध्ये झालेल्या गणतीनुसार, येथे 128.38 किलोग्राम सोने आणि 221.53 किलोग्राम चांदीची आभूषणे आहेत. त्यानंतर […]Read More

ट्रेण्डिंग

होळीसाठी लोकलच्या दाराला झाड बांधून नेणाऱ्या ६ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई, दि. ४ : परंपरागत पद्धतीने होळी साजरी करण्यासाठी विरारमधील काही रहिवासी माहीमकडे लोकलने जात होते. या प्रवासादरम्यान त्यांनी लोकलच्या दरवाजाला सुपारीच्या झाडाचा खांब आडव्या स्थितीत बांधला होता. ज्याच्या झावळ्या दरवाज्यात लोंबकळत होत्या. त्यामुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढताना-उतरताना अडचणी निर्माण होत होत्या. तसेच गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या प्रकाराची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाला मिळताच […]Read More

देश विदेश

३१ देशांच्या सफरीवर निघालेल्या भारतीय ट्रॅव्हल ब्लॉगरचा मृत्यू

मुंबई, दि. ४ : ‘फ्लाईंग खालसा’ नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर रघबीर सिंग भरौवाल यांचा पेरुमध्ये मृत्यू झाला आहे. बाईकवरुन ३१ देश फिरण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. पंजाबच्या भटिंडाचे मूळ रहिवासी असलेले रघबीर सिंग होते. पेरुतील त्रुजिलो शहराजवळ बाईकवरुन जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. रघबीर सिंग यांनी त्यांच्या हार्ले डेव्हिडसनवरुन प्रवासाला […]Read More

ट्रेण्डिंग

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे 316 अधिकारी निलंबित

मुंबई, दि. ४ : राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रकरणांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांना लेखी आदेश देत दिव्यांग प्रमाणपत्रांची व्यापक पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरीत असलेल्या 316 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने निलंबीत केल्याची माहिती मंत्री […]Read More

ट्रेण्डिंग

या देशात पेट्रोलचा दर अवघा दीड रुपये लिटर

मुंबई, दि. ४ : अमेरिकेने आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर तेहरानकडून तीव्र प्रत्युत्तर दिले गेले असून संघर्षाचा विस्तार संपूर्ण पश्चिम आशियात झाला आहे. या कारवाईमुळे संयुक्त अरब अमिरात, कतार, बहरीन, जॉर्डन आणि इराकमधील ठिकाणे लक्ष्य करण्यात आली आहेत. परिणामी, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे, ज्यामुळे अनेक कंपन्यांनी कच्च्या तेलाची वाहतूक तात्पुरती थांबवली […]Read More

देश विदेश

15 लाख युजर्सनी 48 तासांत सोडले ChatGPT

मुंबई, दि. ४ : OpenAI चे सॅम ऑल्टमॅन यांना US डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स यांच्यासोबत केलेला करार त्यांना चांगलाच महागात पडला आहे. 48 तासांपेक्षा कमी कालावधीत 1.5 मिलियन (सुमारे 15 लाख) सदस्यांनी OpenAI चे AI ChatGPT प्लॅटफॉर्म सोडले आहे. हे युजर्स अमेरिका आणि OpenAI यामधील कराराला विरोधत करत आहेत. OpenAI आणि US डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स यांच्यातील […]Read More

राजकीय

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा शरद पवार यांना पाठिंबा

मुंबई, दि. ४ : राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीला एक जागा लढवावी लागणार आहे. या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे. गांधी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

बहुजन विरोधी मानसिकतेला संरक्षण देऊ नये -डॉ.हुलगेश चलवादी

पुणे, दि ४ :- बहुजनांविरोधात गरळ ओकने आज कालची फॅशन झाली आहे. हक्काचे आरक्षण आणि बहुजन विचारधारेला लक्ष करीत चळवळीबद्दल अपप्रचार करण्याचे काम सर्रास सुरु आहे. मात्र, हे प्रकार बहुजनांनी खपवून घेऊ नये. बहुजनांविरोधात गरळ ओकणाऱ्या जेएनयूच्या कुलगुरू शांतिश्री धुलिपुडी पंडित यांची हकालपट्टी करा, अशी मागणी बहुजन नेते, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी बुधवारी (ता.४) […]Read More