Month: August 2023

महानगर

मुलांशी वाद झाला तरी चालेल, पण संवाद पाहिजे!

ठाणे दि १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुलांना मोकळे सोडा. मुलांशी वाद झाला तरी चालेल, पण संवाद पाहिजे! मुलांवर शिस्तीचा ताण नको, पालक हा मुलांचा दोस्त पाहिजे. पालकांनी आपल्या आकांक्षा त्यांच्यावर लादू नये, असे प्रांजळ मत ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या अर्थशास्त्राच्या माजी प्राध्यापिका मेघना मेहेंदळे यांनी व्यक्त केले आहे. प्रा. मेहेंदळे यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या माजी […]Read More

खान्देश

श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिराचे नवीन टाईमटेबल

नाशिक, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातर्फे श्रावण मासासाठी विशेष नियोजन केले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिर पहाटे ४ वाजेलाच उघडणार असून रात्री ९ वाजेपर्यत खुले राहणार आहे. श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांना दर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मंदिर पहाटे ५ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत खुले […]Read More

राजकीय

संविधान बदलासंदर्भातील वक्तव्यांवर मोदींनी खुलासा करावा

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस आणि भाजपामधून सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. विवेक देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही संविधानाचा मूळ ढांचा बदलण्याची […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सुरक्षित प्रवासाच्या ‘ड्रीम’ साठी कोल्हापुरातील लेकी सरसावल्या

कोल्हापूर, दि ,१७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरात सहा ठिकाणी 90 डिग्री वळण घेताना येणारी वाहनं न दिसल्यामुळे बरेच अपघात झाले आहेत. गुडघाभर खड्ड्यातून वाट काढून थकलेल्या कोल्हापुरकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी कोल्हापुरातील लेकी खारीचा वाटा घेत सरसावल्या आहेत. शहरवासियांच्या रस्ते सुरक्षेसाठी प्रशासनानं काळजी घेणं अपेक्षित असताना स्वत:साठी मिळालेल्या पाॅकेट मनीतून रस्ता 90 अंशात वळणाऱ्या ठिकाणी कॉन्वेक्स […]Read More

ट्रेण्डिंग

या बँकांची कर्ज झाली महाग

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात रेपो रेट स्थिर ठेवल्याचे जाहीर केले. त्यानंतर बँकानी व्याजदर स्थिर ठेवणे अपेक्षित होते. मात्र काही बँकांनी व्याजदर वाढवल्याने गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजजरात काहीशी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात कर्जाच्या व्याजदरात लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बँक […]Read More

पर्यावरण

पीएम-ई बस – १०० शहरांतून धावणार १० हजारांहून अधिक इलेक्ट्रिक

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील काळात 100 शहरांमध्ये 10,000 हून अधिक इलेक्ट्रिक बसेस धावतील. यासाठी केंद्र सरकार निधी देणार आहे. या योजनेला पीएम-ई बस असे नाव देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. बस सेवेलाही मान्यता देण्यात आली आहे. या योजनेवर […]Read More

ट्रेण्डिंग

कारागिरांना सक्षम करणाऱ्या विश्वकर्मा योजनेला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात देशातील कारागिरांना आणि कुशल कामगारांना सक्षम करण्यासाठीच्या ‘विश्वकर्मा’ योजनेचा उल्लेख केला होता.आज या योजनेला मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली. याद्वारे देशातील लहान कामगार आणि कारागिरांना आर्थिक मदत होणार आहे. त्यांना कर्ज आणि प्रशिक्षण, प्रगत तंत्रे आणि कौशल्यांची माहिती यासंबंधी मदतही दिली […]Read More

महानगर

भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या कवितांचा मराठी भावानुवाद “गीत नवे

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या कवितांचा मराठी भावानुवाद मराठीतील ख्‍यातनाम कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी केला असून त्‍याचे पुस्‍तक लवकरच प्रकाशि‍त करण्‍यात येईल, अशी घोषणा आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांची कविता मानवतेचा साक्षात्‍कार करणारी आहे, असे प्रतिपादन यावेळी कवी […]Read More

राजकीय

आपला फोटो वापरला तर कोर्टात खेचण्याचा दिला पवारांनी इशारा

छ . संभाजीनगर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मी आहे त्यामुळे आमच्यातून फुटून भाजपा सोबत सत्तेत गेलेल्या लोकांनी माझा फोटो वापरू नये अन्यथा त्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा शरद पवार यांनी आज दिला आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. निवडणूक आयोग हा केंद्र सरकारच्या हातचे बाहुले आहे त्यामुळे तो […]Read More

महानगर

नायर दंत रूग्णालयाची विस्तारित इमारत लवकरच सेवेत

मुंबई दि.16(एम एमसी न्यूज नेटवर्क): पालिकेच्या नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या नवीन विस्तारित इमारतीमुळे रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, समवेत प्रतीक्षा कालावधीदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. अधिकाधिक रुग्णांना किमान दरामध्ये उपचार घेता येणे शक्य होईल. या विस्तारीत इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून त्याबाबतचा आढावा अति पालिका आयुक्त यांनी घेतला. मुंबई सेंट्रल येथील नायर रूग्णालय […]Read More