नायर दंत रूग्णालयाची विस्तारित इमारत लवकरच सेवेत

मुंबई दि.16(एम एमसी न्यूज नेटवर्क): पालिकेच्या नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या नवीन विस्तारित इमारतीमुळे रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, समवेत प्रतीक्षा कालावधीदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. अधिकाधिक रुग्णांना किमान दरामध्ये उपचार घेता येणे शक्य होईल. या विस्तारीत इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून त्याबाबतचा आढावा अति पालिका आयुक्त यांनी घेतला.
मुंबई सेंट्रल येथील नायर रूग्णालय दंत महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारांसाठी येतात. एरवी सरासरी ३५० ते ४०० रुग्ण याठिकाणी उपचार घेतात. तर जास्त गर्दीच्या दिवसांमध्ये ६५० ते ८०० रुग्णांवर उपचार होतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, अधिकाधिक रुग्णांना उपचार पुरवणे शक्य व्हावे म्हणून ११ मजली विस्तारित इमारतीच्या निर्मितीला २०१८ मध्ये सुरूवात झाली. मध्यंतरी कोविड संसर्ग कालावधीत लागू असलेल्या प्रतिबंधामुळे कामात खंड पडला. मात्र, त्यानंतर इमारतीच्या कामाला पुन्हा वेग देण्यात आला आहे.
आता ही इमारत अंतिम टप्प्यात आहे. या इमारतीच्या सर्व मजल्यांची, प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा घेवून काम त्वरेने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्या आहेत . अकरा मजली इमारतीमध्ये पहिले सहा मजले हे रुग्ण सुविधेसाठी असणार आहेत.
SW/KA/SL
16 Aug 2023