या बँकांची कर्ज झाली महाग
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात रेपो रेट स्थिर ठेवल्याचे जाहीर केले. त्यानंतर बँकानी व्याजदर स्थिर ठेवणे अपेक्षित होते. मात्र काही बँकांनी व्याजदर वाढवल्याने गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजजरात काहीशी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात कर्जाच्या व्याजदरात लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा यांनी ऑगस्टमध्ये एमसीएलआर (MCLR) वाढवला आहे. एमसीएलआरच्या आधारावर बँका कार कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्जासाठी व्याजदर ठरवतात.
Bank Of India
बँक ऑफ इंडियाने निवडक मुदतीसाठी एमसीएलआर वाढवला आहे. या वाढीनंतर रात्रीचा एमसीएलआर 7.95 टक्के, तीन आणि सहा महिन्यांचा एमसीएलआर 8.30 टक्के आणि 8.50 टक्के आहे. एक वर्षाचा एमसीएलआर 8.70 टक्के आहे.
Bank Of Baroda
बँक ऑफ बडोदाने सर्व मुदतीसाठी एमसीएलआर (MCLR) मध्ये 0.05 टक्के वाढ केली आहे. नवीन दर 12 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर बँकेचा एमसीएलआर 8 टक्के झाला आहे.
HDFC Bank
एचडीएफसी बँकेने निवडक कालावधीसाठी एमसीएलआर 0.15 टक्क्यापर्यंत वाढवला आहे. नवे दर 7 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. बँकेने एका रात्रीचा एमसीएलआर 10 बेसिस पॉइंट्सने वाढवून 8.35 टक्के केला. पूर्वी तो 8.25 टक्के होता. एक महिन्याचा एमसीएलआर पूर्वी 8.30 टक्क्यांवरून 8.45 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी तीन महिन्यांच्या एमसीएलआरमध्ये 0.10 टक्के वाढ करण्यात आली आहे. हा दर 8.60 टक्क्यांवरून 8.70 टक्के झाला आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर 8.90 टक्क्यांवरून 8.95 टक्के केला आहे. एक वर्षाचा एमसीएलआर 9.05 टक्क्यांवरून 9.10 टक्के करण्यात आला आहे.
ICICI बँक
ICICI बँकेकडून सर्व मुदतीच्या एमसीएलआरमध्ये 0.5 टक्के वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर, एक वर्षाचा एमसीएलआ 8.40 टक्के, तीन आणि सहा महिन्यांचा एमसीएलआर 8.45 टक्के आणि 8.80 टक्के झाला आहे.
SL/KA/SL
16 Aug 2023