कारागिरांना सक्षम करणाऱ्या विश्वकर्मा योजनेला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात देशातील कारागिरांना आणि कुशल कामगारांना सक्षम करण्यासाठीच्या ‘विश्वकर्मा’ योजनेचा उल्लेख केला होता.आज या योजनेला मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली. याद्वारे देशातील लहान कामगार आणि कारागिरांना आर्थिक मदत होणार आहे. त्यांना कर्ज आणि प्रशिक्षण, प्रगत तंत्रे आणि कौशल्यांची माहिती यासंबंधी मदतही दिली जाईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
विश्वकर्मा योजनेची वैशिष्ट्ये आणि तरतूदी
या योजनेअंतर्गत नवीन कौशल्ये, साधने, क्रेडिट सपोर्ट आणि मार्केट सपोर्ट दिला जाईल.
योजनेअंतर्गत दोन प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. बेसिक आणि अॅडव्हान्स.
प्रशिक्षणादरम्यान दररोज 500 रुपये मानधनही दिले जाणार आहे.
आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी सरकार 15,000 रुपयांची मदत करणार आहे.
एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. कमाल व्याज 5% असेल.
एक लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात 2 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होईल.
नवीन साधने, क्रेडिट समर्थन आणि नवीन बाजार समर्थन प्रदान केले जाईल.
ब्रँडिंग, ऑनलाइन मार्केट ऍक्सेस यासारखा पाठिंबा दिला जाईल.
SL/KA/SL
16 Aug 2023