Month: August 2023

पर्यावरण

पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा जोर

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑगस्टच्या सुरुवातीला राज्यात पावसाने हजेरी लावली होती आणि महिनाअखेरीस तो परत येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. कालपासून राज्यभरात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजात आनंदाचे वातावरण आहे. येत्या दोन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर नागपूर आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट […]Read More

अर्थ

सलग चौथ्या आठवड्यात भारतीय बाजारात (Stock Market)विक्री

जितेश सावंत 18 ऑगस्ट रोजी संपलेल्या सलग चौथ्या आठवड्यात भारतीय इक्विटी बाजारात विक्री दिसून आली.उच्च व्याजदर(higher interest rates),फेड दर वाढीची भीती, कमकुवत जागतिक संकेत,चीनमधील मंदी(default risk in China),वाढती महागाई (rising inflation),कमकुवत चलन आणि उच्च रोखे उत्पन्न (weakening currency and higher bond yields),आयटी समभागांवरील दबाव ,मान्सूनची चिंता यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत सातत्याने भर पडत आहे व बाजारातून […]Read More

महानगर

मुंबईकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार कायम

मुंबई दि.19(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो नाही. तसेच जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही अशी माहिती महापालिकेच्या जलविभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी टंचाईची चिंता कायमच असल्याची शक्यता व्यक्त […]Read More

महानगर

राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर , प्रो-गोविंदा स्पर्धा होणार

मुंबई, दि.१९(एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धा होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला बंदरे युवक व क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे […]Read More

देश विदेश

ICC कडून वर्ल्डकपच्या शुभंकरचे अनावरण, नामकरणासाठी होणार स्पर्धा

गुरुग्राम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयसीसीने आज (दि. 19) गुरूग्राम येथील एका कार्यक्रमात भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या शुभंकरचे अनावरण केले. यावेळी 19 वर्षाखालील वर्ल्डकप विजेत्या भारतीय महिला आणि पुरूष संघाचे कर्णधार शफाली वर्मा आणि यश धूल हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे आयसीसीने शुभंकर अनावरण कार्यक्रमावेळीच या शुभंकरला नाव देण्यासाठी एका स्पर्धेची देखील […]Read More

महिला

U-20 जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्ण

अम्मान, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जॉर्डनमधील अम्मान आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान 20 वर्षांखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2023 खेळवली जात आहे.या स्पर्धेत काल शुक्रवारी रात्री उशिरा भारतीय महिला कुस्तीपटू अंतिम पंघालने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. सलग दोनदा अंडर-20 जागतिक कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी ती भारतातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली. तिने येथे […]Read More

ट्रेण्डिंग

या व्याघ्र प्रकल्पाची तब्बल १२ कोटींची फसवणूक

चंद्रपूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला वर्षभर देश-विदेशातून हजारों पर्यटक भेच देत असतात. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी येथे जाण्यासाठी बुकींग करावे लागते. यासाठी नेमलेल्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन या सफारी बुकिंग एजन्सीने अभयारण्य प्रशासनाची तब्बल तब्बल १२ कोटी १५ लाख रुपयांची फडवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला […]Read More

देश विदेश

लवकरच होणार या धुमकेतूचे दर्शन, तेही दुर्बिणीशिवाय

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आकाशातील ग्रहगोलांप्रमाणेच गोलाकार तेजस्वी शिर आणि त्याला जोडून लांबच्या लांब तेजस्वी शेपटीसारखा पिसारा असणाऱ्या धूमकेतू बाबत खगोलप्रेमींना विशेष आकर्षण वाटते.अन्य खगोलांपेक्षा अनोखा आकार हे या उत्सुकतेचे मूळ असले तरीही धूमकेतूचे कित्येंक वर्षांनंतर क्वचितच होणारे दर्शन ही बाबही महत्त्वाची आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात असाच एक दुर्मिळ धूमकेतू आपल्याला पाहता […]Read More

राजकीय

पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न ‘ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. ‘ टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे विश्वास अशी जगभर ख्याती असलेल्या उद्योग समूहाचे रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्याने पुरस्काराचा सन्मान वाढला आहे,’असे मुख्यमंत्री शिंदे […]Read More

विदर्भ

सर्पमित्रांनी दिले ८ हजार सापांना जीवनदान….

वाशिम, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साप म्हणजे सरपटत येणारा मृत्यू हा अनेकांचा असणारा समज वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील सर्पमित्र हर्षल रामटेके आणि त्यांच्या निसर्ग व्यासंगी सहकाऱ्यांनी दूर केला असून आजपावेतो वाशिम जिल्ह्यातील या सर्पमित्रांनी तब्बल ८ हजार सापांना मानवी वस्तीतुन सुरक्षित पकडून निसर्ग अधिवासात सोडून देउन जीवनदान दिले आहे. सापाबद्दल समाजामध्ये अनेक समज गैरसमज असून […]Read More