U-20 जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्ण

 U-20 जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्ण

अम्मान, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जॉर्डनमधील अम्मान आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान 20 वर्षांखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2023 खेळवली जात आहे.या स्पर्धेत काल शुक्रवारी रात्री उशिरा भारतीय महिला कुस्तीपटू अंतिम पंघालने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. सलग दोनदा अंडर-20 जागतिक कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी ती भारतातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली. तिने येथे 53 किलोमध्ये विजेतेपद पटकावले.

अंतिम फेरीत तिने युक्रेनच्या मारिया येफ्रेमोव्हाचा ४-० असा पराभव केला. गेल्या वर्षी, अंडर-20 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. अंतिम आता वरिष्ठ पातळीवरही खेळते.

सवितानेही 62 किलो वजनी गटात विजेतेपद पटकावले. प्रिया मलिकने गुरुवारी ७६ किलो गटात विजेतेपद पटकावले. ६२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सविताने व्हेनेझुएलाच्या ए.पाओलाचा पराभव केला.

SL/KA/SL

19 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *