ICC कडून वर्ल्डकपच्या शुभंकरचे अनावरण, नामकरणासाठी होणार स्पर्धा

गुरुग्राम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयसीसीने आज (दि. 19) गुरूग्राम येथील एका कार्यक्रमात भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या शुभंकरचे अनावरण केले. यावेळी 19 वर्षाखालील वर्ल्डकप विजेत्या भारतीय महिला आणि पुरूष संघाचे कर्णधार शफाली वर्मा आणि यश धूल हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे आयसीसीने शुभंकर अनावरण कार्यक्रमावेळीच या शुभंकरला नाव देण्यासाठी एका स्पर्धेची देखील घोषणा केली. ही स्पर्धा 27 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. चाहत्यांना या शुभंकरला नाव देत वर्ल्डकपवर आपली छाप सोसडण्याची संधी देखील आहे.
अद्याप नामकरण बाकी असलेला पुरूष आणि महिला शुभंकर हा स्त्री पुरूष समानतेचं प्रतिक आहे. आयसीसीचे इव्हेंट हेड ख्रिस टेट्ले यांनी सांगितले की, ‘आम्हाला आयसीसी पुरूष वर्ल्डकप 2023 चा आयसीसी शुभंकर लाँच करताना अत्यानंद होत आहे.’
‘हा शुभंकर हा संस्कृती आणि सीमांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र करण्याचं काम करणाऱ्या क्रिकेटचं उत्तम प्रतिक आहे. हा शुभंकर दोन्ही स्त्री आणि पुरूषांचे प्रतिनिधित्व करत आहे. हा जगात स्त्री – पुरूष समानतेचा संदेश देत आहे.’
ख्रिस पुढे म्हणाले की, ‘आयसीसीचा उद्येश हा क्रिकेटचा प्रसार पुढच्या पिढीमध्ये देखील करण्याचा आहे. या उद्येश आयसीसीचा शुभंकर योग्य प्रकारे साध्या करत आहे. या शुभंकरद्वारे मुलांमध्ये क्रिकेटबद्दल दीर्घकालीन प्रेम निर्माण होईल.’
SL/KA/SL
19 Aug 2023