सलग चौथ्या आठवड्यात भारतीय बाजारात (Stock Market)विक्री

 सलग चौथ्या आठवड्यात भारतीय बाजारात (Stock Market)विक्री

जितेश सावंत

18 ऑगस्ट रोजी संपलेल्या सलग चौथ्या आठवड्यात भारतीय इक्विटी बाजारात विक्री दिसून आली.उच्च व्याजदर(higher interest rates),फेड दर वाढीची भीती, कमकुवत जागतिक संकेत,चीनमधील मंदी(default risk in China),वाढती महागाई (rising inflation),
कमकुवत चलन आणि उच्च रोखे उत्पन्न (weakening currency and higher bond yields),आयटी समभागांवरील दबाव ,
मान्सूनची चिंता यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत सातत्याने भर पडत आहे व बाजारातून बाहेर पडण्याकरिता प्रोत्साहन मिळत आहे.

शुक्रवारी बाजार रिकव्हर होण्यात अयशस्वी ठरला आणि बाजाराने 1-महिन्याहून अधिक नीचांकी पातळीवर बंद दिला. Foreign institutional investors (FIIs) remained sellers for the fourth consecutive week.

येणाऱ्या आठवड्यात बाजाराचे लक्ष जागतिक घडामोडींकडे असेल.
Technical view on nifty-. बाजारात गेल्या आठवड्यात अस्थिरता वाढताना दिसली.बाजार तांत्रिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. शुक्रवारी निफ्टीने 19310.2 चा बंद भाव दिला.मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे बाजारातील घसरण वाढली व दिलेल्या सगळ्या खालच्या पातळ्यांना स्पर्श केला.
येणाऱ्या आठवड्यात निफ्टी साठी 19253 -19201 हे महत्वाचे सपोर्ट स्तर आहेत हे तोडल्यास निफ्टी 19189-19076-
19024-18972-18861 हे स्तर गाठेल.

वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 19300-19310-19327-19361-19373-19385-19412हे स्तर रेसिस्टन्स (resistance) ठरतील.
बाजारातील पडझडीचा गुंतवणूकदारानी फायदा उचलावा आणि दीर्घकाळाकरिता गुंतवणूक करावी.

खालच्या स्तरावरून बाजार उसळला.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अस्थिर अश्या सत्रात बाजाराने स्मार्ट रिकव्हरी दाखवली. बाजाराची सुरुवात गॅप डाउन झाली व बाजार दुपारपर्यंत खालीच राहिला त्यानंतर बाजारात रिकव्हरी झाली परंतु शेवटच्या तासातील नफावसुली मुळे बाजार सपाट बंद झाला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 79.27 अंकांनी वधारून 65,401.92 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 6.20 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,434.50 चा बंद दिला.

Market bounces back

सेन्सेक्सची नीचांकावरून 507अंकांची उसळी
कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजाराची सुरुवात नकारात्मक नोटवर झाली, बाजाराने सुरुवातीला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु बाजार घसरला तथापी, पुन्हा एकदा शेवटच्या तासाच्या खरेदीने निर्देशकांना दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद होण्यास मदत केली.धातू आणि बँका वगळता सर्व क्षेत्रांमध्ये खरेदी झाली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 137.50 अंकांनी वधारून 65,539.42 वर बंद झाला.
दुसरीकडे निफ्टीत 30.50 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,465 चा बंद दिला.

Sensex rebounds 507 pts from lows

निफ्टी 19,400 च्या खाली
मागील दोन सत्रात बुल्सनी चांगली झुंज दिल्यानंतर गुरुवारी बेअर्स नी पुन्हा एकदा बाजाराचा ताबा घेतला.बाजाराची सुरुवात सपाट झाली परंतु नंतर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स 65,000 च्या जवळ आणि निफ्टी 19,350 च्या खाली जाताना दिसले. तथापी, इंट्रा-डे रिकव्हरी मुळे मार्केट दिवसाच्या नीचांकी पातळीच्या वर बंद होण्यात यशस्वी झाला, दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 388.40 अंकांनी घसरून 65,151.02 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 99.70 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,365.30 चा बंद दिला. Nifty below 19,400
सेन्सेक्स 202 अंकांनी घसरला.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजाराची सुरुवात नकारात्मकतेने झाली आणि बहुतांश सत्रात बाजार लाल रंगातच राहिला. शेवटच्या तासात काही प्रमाणात बाजाराने रिकव्हरीचा प्रयत्न केला परंतु किरकोळ नुकसानासह सत्र बंद झाले.अत्यंत अस्थिर अश्या सत्रात भारतीय निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी घसरले.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 202.36 अंकांनी घसरून 64,948.66 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 55.10 अंकांची घट होऊन निफ्टीने19,310.15 चा बंद दिला. Sensex 202 pts down

( लेखक शेअरबाजार
तज्ञ, तसेच Techncal
and Fundamental
Analyst आहेत )

jiteshsawant33@gmail.com

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *