इंदूर, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2019-20 साठीचे प्राप्तिकर विवरण दंडाशिवाय भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर 1 जानेवारीपासून वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणार्या करदात्यांना एक हजार रुपये दंड आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांना दहा हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. साधारणपणे 31 जुलैनंतर दंड एक हजार आणि पाच […]Read More
नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत दोन-अंकी विकासदर गाठू शकतो असा विश्वास अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. ठाकूर यांनी सांगितले की, तरुण आणि महत्वाकांक्षी वर्ग तसेच ग्रामीण क्षेत्राकडून निर्माण झालेया मागणीच्या जोरावर उत्पादन कामांचा विस्तार होईल आणि डिजिटल सेवा क्षेत्रात तेजी दिसून येईल. या जोरावर दोन अंकी विकास दर गाठण्याची […]Read More
नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड साथीने शंभर वर्षात पहिल्यांदाच रेल्वेची चाके इतक्या दीर्घ काळासाठी खिळवून ठेवली आहेत. भारताची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या रेल्वेचे कोविड-19 ने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. प्रवासी गाड्यांद्वारे होणार्या रेल्वेच्या उत्पन्नामध्ये 87 टक्क्यांची घट झाली आहे. कोविडमुळे सध्या केवळ 1089 विशेष गाड्या धावत आहेत. रेल्वेच्या सुमारे 30 हजार कर्मचार्यांना […]Read More
शेतकऱ्यांना महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमातून मिळतोय एकीचा मंत्र, शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर असंघटितपणाचा शिक्का पुसून संस्थात्मक पातळीवर नव्याने एकत्र येण्याची प्रेरणा राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमामधून शेतकऱ्यांना मिळू लागली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आजवर 79 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे ठराव संमत केले […]Read More
नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसंदर्भात केंद्र सरकार पुढे जात आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की ज्या कंपन्यांमधील सरकारी हिस्सा विक्री करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे अशा कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीस गती दिली जाईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात थेट परकीय गुंतवणूक […]Read More
नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर दिलासा देणारे वृत्त आहे. भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या संशोधन अहवालात जीडीपी वाढीचा अंदाज वाढविण्यात आला आहे. एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे की अर्थव्यवस्थेतील सुधारणांमुळे वित्तीय वर्ष 21 साठी जीडीपी विकास दर उणे 7.4 टक्के असण्याची शक्यता आहे, आधीच्या अंदाजानुसार हा आकडा उणे 10.9 टक्के होता. या व्यतिरिक्त […]Read More
नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तोट्यात असलेली विमान कंपनी एअर इंडियाच्या संपादनासाठी टाटा समुहासह अनेक कंपन्यांनी प्रारंभिक निविदा दाखल केल्या आहेत. दरम्यान, एअर इंडियाच्या 209 वरिष्ठ कर्मचार्यांनीही या निविदेमध्ये भाग घेतला आहे. दुसरीकडे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव (दीपम) तुहीन कांत पांडेय यांनी ट्विट केले की एअर इंडियाच्या रणनितिक निर्गुंतवणुकीसाठी अनेक स्वारस्यपत्रे […]Read More
पानीपत, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जास्त खर्च आणि बाजारात कमी किंमतीमुळे शेतकरी बटाटे लागवड करण्यास टाळाटाळ करीत होते, अशातच कैथल जिल्ह्यातील पट्टी अफगाण खेड्यातील रहिवासी अशोक संधू या शेतकऱ्याला लाल बटाट्याच्या पिकाने मालामाल केले आहे. शेतकरी अशोक संधू 20 एकरांवर लाल बटाट्यांची लागवड करतात. ते एकरी 1 लाख 50 हजार रुपये नफा कमवत […]Read More
नवी दिल्ली, दि.14(एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाची व्यापक आर्थिक परिस्थिती खुपच अनिश्चित आहे आणि चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) सुमारे 10 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. असे मत माजी मुख्य सांख्यिकीतज्ञ प्रणव सेन यांनी व्यक्त केले आहे. सेन यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की नरेंद्र मोदी सरकारने केलेली अर्थव्यवस्थेची एकूणच व्यापक व्यवस्था फारशी चांगली नाही, […]Read More
नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांच्या मालमत्तेमध्ये नुकतीच जबरदस्त वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, इलोन मस्क यांची संपत्ती 152 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अशाप्रकारे, त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकले आहे. ते जागतिक […]Read More