#अर्थव्यवस्थेत होऊ शकते 10 टक्क्यांची घसरण – माजी मुख्य सांख्यिकीतज्ञ प्रणव सेन यांचे मत

 #अर्थव्यवस्थेत होऊ शकते 10 टक्क्यांची घसरण –  माजी मुख्य सांख्यिकीतज्ञ प्रणव सेन यांचे मत

नवी दिल्ली, दि.14(एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाची व्यापक आर्थिक परिस्थिती खुपच अनिश्चित आहे आणि चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) सुमारे 10 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. असे मत माजी मुख्य सांख्यिकीतज्ञ प्रणव सेन यांनी व्यक्त केले आहे.
सेन यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की नरेंद्र मोदी सरकारने केलेली अर्थव्यवस्थेची एकूणच व्यापक व्यवस्था फारशी चांगली नाही, परंतु अर्थव्यवस्थेतील ही मंदी त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहे. सेन यांनी सांगितले की भारताची सद्य व्यापक आर्थिक स्थिती अतिशय अनिश्चित आहे. मी म्हणेन की आपण खूपच सावध राहिले पाहिजे. मला असे वाटते की आसपास थोडे जास्त आशादायक चित्र आहे.
त्यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2020-21 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा वास्तविक विकास दर नकारात्मक 10 टक्के असेल. सेन म्हणाले की, तिमाही जीडीपीची आकडेवारी अजुनही काही कॉर्पोरेट खात्यांवर आधारित असते. कॉर्पोरेट क्षेत्राची कामगिरी बिगर कॉर्पोरेट क्षेत्रापेक्षा फारशी वाईट झालेली नाही.
प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ म्हणाले, “आम्हाला माहिती आहे की कंपन्यांच्या तुलनेत सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रावर जास्त परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय खात्यांकडून येणारी आकडेवारी अर्थव्यवस्थेचे अधिक आशावादी चित्र दर्शवित आहे.
सेन यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवण्यावरही भर दिला. ते म्हणाले की गुंतवणूकदार हे नवीन लोक असतात जे नवीन उत्पादन क्षमतांमध्ये आपले पैसे गुंतवतात. जी सध्या पूर्णपणे लुप्त आहे. ते म्हणाले की जोपर्यंत गुंतवणूक परत होत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था वाढू शकत नाही. सेन म्हणाले की, आता जशी परिस्थिती आहे त्यानुसार आपली उत्पादन क्षमता 2019-20 च्या तुलनेत जास्त होणार नाही. खरं तर, ती त्यापेक्षाही कमी होईल, कारण आता काही क्षमता बंद झाल्या आहेत.
सेन सांख्यिकीच्या स्थायी समितीचे (एससीईएस) प्रमुखही आहेत. ते म्हणाले की समिती अद्याप आपला अहवाल अंतिम करु शकलेली नाही. सप्टेंबरच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा चांगली प्रगती दर्शविली आहे. उत्पादन क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे सप्टेंबरच्या दुसर्‍या तिमाहीत जीडीपीतील घसरण कमी होऊन 7.5 टक्क्यांवर आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 23.9 टक्क्यांनी घसरली होती. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत 7.5 टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज आहे.
Tag-Economist/Pranav Sen/GDP/Fall
PL/KA/PL/14 DEC/2020

mmc

Related post