#31 डिसेंबरपर्यंत प्राप्तिकर विवरण भरले नाही तर 10 हजार रुपयांचा दंड

 #31 डिसेंबरपर्यंत प्राप्तिकर विवरण भरले नाही तर 10 हजार रुपयांचा दंड

इंदूर, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2019-20 साठीचे प्राप्तिकर विवरण दंडाशिवाय भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर 1 जानेवारीपासून वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या करदात्यांना एक हजार रुपये दंड आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांना दहा हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे.
साधारणपणे 31 जुलैनंतर दंड एक हजार आणि पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागतो, परंतू यावेळी कोरोनामुळे केंद्राने दंडाशिवाय प्राप्तिकर विवरण भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
त्याचवेळी विविध कर संस्था, सीए असोसिएशन आदींनी ही तारीख वाढविण्याची मागणी सुरू केली आहे. असोसिएशनचे म्हणणे आहे की कोविड साथीमुळे अनेक करदाते अजुनही प्राप्तिकर विवरण भरण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांना विनाकारण दंड आकारला जाईल.
Tag-Income Tax/Return/Penalty/31 December
PL/KA/PL/22 DEC 2020

mmc

Related post