mmcnews mmcnews

Uncategorized

सेल्फीच्या नाद आला अंगलट; युवती कोसळली खोल दरीत..

सातारा, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील ठोसेघर-सज्जनगड परिसरात बोरणे घाटात एक तरुणी सेल्फी काढत असताना दरीत कोसळली होती. या तरुणीला महाबळेश्वर टेकर्स आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने जिवंत बाहेर काढले. जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक आकर्षित होत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती तथा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील धबधबे, पर्यटन स्थळे तसेच धोकादायक […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, पूरस्थिती जैसे थे

कोल्हापूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापुरात १४ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील ७४बंधाऱ्यांवर अद्याप पाणी आहे.सुमारे २०० हून अधिक गावांची वाहतूक मार्गावर पाणी असल्याने अद्याप विस्कळीतच आहे. पंचगंगा नदी आज सकाळी सात वाजता ४१.८ फुटांवर होती. धोका पातळी 43 फूट आहे . आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्टच दिला आहे. आज […]Read More

महानगर

भातसा धरण ओव्हरफ्लो, धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले.

ठाणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहापूर तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि याच तालुक्यातील तानसा, वैतरणा, भातसा या धरणांमधून मुंबई ला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यंदाच्या पावसाळ्यात मागील 8-10. दिवसात तानसा, वैतरणा ही धरणे भरून वाहू लागली आहेत. आज भातसा धरण सुद्धा ओसंडून वाहू लागले आहे. काल संध्याकाळी 6:30 च्या सुमारास […]Read More

गॅलरी

निम्म्या पावसाळ्यातही एकबुर्जी प्रकल्प तहानलेलाच!

वाशिम, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ ३२.६६ टक्के एवढाच पाणीसाठा असून पावसाळा अर्धा होऊन गेला तरीही प्रकल्पातील पाणी पातळी न वाढल्यानं वाशिम शहरवासीयांची चिंता वाढली आहे. सध्या शहराला नगरपरिषदेकडून दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान जिल्ह्यातील इतर दोन मध्यम प्रकल्पाची स्थिती मात्र उत्तम आहे. त्यामध्ये सोनल प्रकल्प […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत भारतीय सैन्य दलाकडून मदत कार्य सुरु

सांगली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी आज दुपार पर्यंत स्थिर होती, सांगलीतील आरवाडे प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोड वरील घरात अजून ही पुराचं पाणी आहे. सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट येथीलपूरग्रस्त नागरिकांनसाठी भारतीय सैन्य दलाकडून मदत कार्य सुरु केले आहे. आज बोटीतून जाऊन भारतीय सैन्य […]Read More

पर्यटन

” श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन ” उपक्रमाची उद्यापासून सुरुवात…

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील एसटी महामंडळाच्या विविध आगारांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. यामाध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार असून महामंडळाने प्रवाशांनी या उपक्रमात जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन केले आहे. श्रावण […]Read More

विदर्भ

शिवसेना उबाठा युवनेत्याच्या घरून सापडला काडतुसांचा साठा

चंद्रपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उबाठा गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरून काडतुसांचा मोठा साठा सापडला आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याच्या घरी पोलीस पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. घरी 7.65 mm ची एकूण 40 काडतुसे सापडल्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत. यासाठी शहरातील इंदिरानगर भागातील सहारे याच्या […]Read More

देश विदेश

BSF प्रमुख आणि उपप्रमुखांची केंद्र सरकारकडून उचलबांगडी

नवी दिल्ली, दि.03(एमएमसी न्यूज नेटवर्क).: केंद्र सरकारनं सीमा सुरक्षा दलाच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांना पदावरुन हटवलं आहे. बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल आणि विशेष महासंचालक वाय. बी. खुरानिया यांची गृह मंत्रालयाकडून उचलबांगडी करण्यात आली आहे. याबद्दलचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांना तातडीनं त्यांच्या गृह राज्यांमध्ये पाठवण्यात आलं आहे. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यात आलेल्या अपयशामुळे […]Read More

देश विदेश

Paris Olympic: मनूची हॅटट्रिक थोडक्यात हुकली, भारतासाठी आजचा दिवस निराशेचा

पॅरिस, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पॅरिस ऑलिम्पिकच्या 8व्या दिवशी भारताला तिरंदाजी आणि नेमबाजीत 2 पदकांची अपेक्षा होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. महिला नेमबाजीत शनिवारी महिलांच्या 25 मीटर पिस्तुलची अंतिम फेरी पार पडली.भारतीय नेमबाज मनू भाकरचे तिसरे पदक हुकले. अंतिम फेरीत ती चौथ्या स्थानावर राहिली. कांस्यपदक जिंकणाऱ्या हंगेरीच्या मेजर वेरोनिकाकडून मनूला शूटऑफमध्ये पराभव […]Read More

देश विदेश

भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेसाठी या अंतराळवीरांची नियुक्ती

मुंबई, दि.३ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेसाठी भारताने आपल्या प्रमुख अंतराळवीराची निवड केली आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे या मोहिमेचे प्रमुख अंतराळवीर असतील. कॅप्टन प्रशांत नायर यांचीही या मोहिमेसाठी निवड करण्यात आल्याचे इस्रोने काल जाहीर केले. बॅकअप म्हणून तो त्याचा भाग असेल. शुभांशु इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) कधी जाणार याची तारीख […]Read More