mmcnews mmcnews

आरोग्य

ठाणे-पालघर जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदर्श ठरेल

ठाणे, दि..22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणे आणि पालघर जिल्हयातील गोरगरीबांना फायदा होणार आहे. अनेक कुटुंबांचे जीव वाचवले जाणार आहेत. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य, महिला व बाल अणि […]Read More

राजकीय

मलिकांनी मोदींचा चेहरा जनतेसमोर आणल्यानेच सीबीआयची नोटीस

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुलवामा घटना झाली त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते, त्यावेळच्या घटनेचे सत्य त्यांनी जनतेसमोर उघड केले. आपल्या जवानांवर केलेला तो भ्याड हल्ला आहे, त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे पण उत्तर न देता नरेंद्र मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला म्हणूनच सत्यपाल मलिकांना सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली […]Read More

ट्रेण्डिंग

रमजान ईद निमित्त राज्यात ठिकठिकाणी नमाज पठण

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुस्लिम समाजात अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता आज 22 एप्रिलला रमजान ईदने झाली. गेल्या महिन्याभरापासून मुस्लिम समाज बांधव रोजा (उपवास )पकडून अल्लाची उपासना, प्रार्थना करत होत रमजान महिन्याचा आजचा शेवटचा दिवस रमजान ईद ने राज्यात साजरा केला गेला. ईद निमित्त मुस्लिम समाज बांधव राज्यभरातील ईदगाह मैदानावर […]Read More

अर्थ

आयटी क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारात घसरण

जितेश सावंत, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय इक्विटी मार्केटने सलग तीन आठवड्यांपासूनचा वाढीचा सिलसिला तोडला.अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात बाजारात 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.FII च्या गुंतवणुकीचे विक्रीत झालेले रूपांतर, भारतीय कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल,इन्फोसिसच्या कमकुवत निकालाने आयटी क्षेत्रातील शेअर्सची जोरदार विक्री आणि Fed द्वारे त्याच्या आगामी धोरण बैठकीतील संभाव्य दर वाढ यामुळे गेल्या […]Read More

ट्रेण्डिंग

‘दगडूशेठ’ गणपती ला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुणे, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती आंब्यांच्या आकर्षक आरास केली होती. मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभा-यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. श्रीमंत […]Read More

महानगर

देशातील कायदा आणि संविधानाची सुध्दा हत्या झाली आहे

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गुजरातमधील नरोदा दंगलीतील ज्या लोकांची हत्या झाली. ती हत्या कशाने झाली. जर कुणी हल्लाच केला नाही तर हत्या झाली कशी? हत्या होते आणि हत्येकरु निर्दोष सोडले जातात म्हणजे एकादृष्टीने ज्यांची हत्या झाली त्यांचीही हत्या झाली तेही गेले आणि या देशात जो कायदा आहे जी कायद्याची व्यवस्था आहे. जे संविधान […]Read More

सांस्कृतिक

मुंबईमध्ये चंद्रदर्शन, उद्या साजरी होणार ईद

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या महिन्याभरापासून मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र अशा रमजान महिन्याचे रोजे सुरू आहेत. ईदचे चंद्रदर्शन झाले की या महिन्याभराच्या उपवासांची सांगता करण्यात येते. आज मुंबईमध्ये चंद्रदर्शन झाले असून उद्या सर्वत्र रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. यावर्षी 24 मार्चपासून रमजानचा पवित्र महिना सुरू झाला. यावेळी उपवास म्हणजेच रोजे 29 […]Read More

पर्यावरण

हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात भारत आघाडीवर

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हवामान बदल हे जगासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे देशातील महत्त्वाच्या नेत्यांनी मान्य केले आहे. यूएस सरकारने गुरुवारी (20 एप्रिल) प्रमुख अर्थव्यवस्थांच्या ऊर्जा आणि हवामान-संबंधित मंचाच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बिडेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हवामान बदलाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. या बैठकीला जगभरातील विविध देशांचे […]Read More

करिअर

दूरदर्शन भर्ती 2023

नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  DD News मध्ये व्हिडिओग्राफर म्हणून काम करण्यासाठी दूरदर्शनने उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी (दूरदर्शन भर्ती 2023) अर्ज करायचा आहे, ते प्रसार भारतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. कामाचे ठिकाण नवी दिल्ली असेल. अर्जदार जाहिरात प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अर्ज सादर करू शकतात.prasarbharat.org. […]Read More