mmcnews mmcnews

कोकण

देवगडच्या प्रत्येक आंब्यावर असणार आता युनिक कोड स्टिकर

सिंधुदुर्ग, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अस्सल देवगड हापूस आंबा विकत घेताना ग्राहकांची अनेकदा फसवणूकच होते. परप्रांतातील हापूस देवगडचा हापूस सांगून सर्रासपणे विकले जातात. आता मात्र यावर आळा बसणार आहे. देवगड मध्ये पिकवलेल्या प्रत्येक आंब्यावर आता एक युनिक कोड स्टिकर लावण्यात येणार आहे. या स्टिकरच्या माध्यमातून आंब्याची अस्सलता स्पष्ट होणारा आहे. युनिक कोड वरील […]Read More

राजकीय

भाजपला हवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विधानसभेपेक्षा मोठा विजय

शिर्डी, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन‎ आज शिर्डीत पार पडले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून जोरदार हल्लाबोल केला. तर देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहाद पार्ट-2 सुरू असल्याचा खळबळजनक दावा केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विधानसभेपेक्षाही मोठा विजय झाला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री […]Read More

ऍग्रो

संक्रांतीच्या तोंडावर गुळाला योग्य भावच नाही…

जालना दि १२– जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक यंदा कमी असल्याचं चित्र असून संक्रांत तोंडावर आली तरी गुळाला योग्य भाव मिळत नसल्याने जालन्यातील गूळ व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केलीय. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या गुळाची आवक कमी असल्याचं चित्र दिसून येत आहे. सध्या तीन ते चार हजार रुपये क्विंटलने गुळाची विक्री केली जात […]Read More

विदर्भ

अमरावतीत 100 हून जास्त महिलांना विषबाधा

अमरावती, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावतीच्या जवळ असणाऱ्या नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या तब्बल १०० पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली.अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीत ही घटना घडली आहे. सर्व महिलांवर अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही महिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कंपनीतील […]Read More

विज्ञान

अंटार्क्टिकात सापडले लाखो वर्षांची रहस्ये उलगडणारे ‘टाइम मशिन’

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पृथ्वीची उत्पत्ती आणि मानववंशाच्या उत्क्रांतीची अनेक रहस्ये उलगडण्यासाठी शास्त्रज्ञांचे सातत्यपूर्ण संशोधन सुरु असते. या संशोधनात सहाय्यभूत ठरणाऱ्या आणि काळाच्या पाउलखुणा उमटलेल्या वस्तू सापडल्या की या संशोधनाला अधिक बळकटी मिळते. असेच एक रहस्य उलगडणारी नैसर्गिक वस्तू आता अंटार्क्टिकामध्ये शास्त्रज्ञांनी शोधुन काढली आहे. भारतापासून साडेसात हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या अंटार्क्टिकाच्या […]Read More

अर्थ

या महारत्न कंपनीच्या महसुलात मोठी वाढ

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (IREDA) या सरकारी महारत्न कंपनीचा डिसेंबर २०२४ च्या तिमाहीत निव्वळ नफा (कर वगळून) ४२५.४ कोटी रुपये झाला, जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील ३३५.५ कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक आधारावर २६.८ टक्क्यांनी वाढला आहे. सप्टेंबर २०२४ च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा तिमाही आधारावर १० […]Read More

ट्रेण्डिंग

DRDO ने सैनिकांसाठी तयार केले -२० तापमानात संरक्षण देणारे ‘हिमकवच’

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने सियाचीन आणि लडाख सीमेवर कडाक्याच्या थंडीत तैनात असलेल्या सैनिकांसाठी नवीन युनिफॉर्म लाँच केला आहे. त्याला हिमकवच असे नाव देण्यात आले आहे. युनिफॉर्मने सर्व चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. स्नो शील्ड 20°C ते -60°C या तापमानात काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. मीडिया […]Read More

ट्रेण्डिंग

आळंदीतील सर्व वारकरी शिक्षणसंस्था बंद करण्याचा स्थानिक ग्रामस्थांचा ठराव

आळंदी, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीमध्ये लाखो भाविक दरवर्षी नित्यनेमाने येतात. या भूमीचे पावित्र्य ओळखून आध्यात्मिक शिक्षणासोबत शालेय शिक्षणाची जोड देत अनेक खासगी वारकरी शिक्षण संस्था उदयास आल्या. राज्याच्या कानाकोपर्‍यातून वारकरी शिक्षण घेण्यासाठी हजारो विद्यार्थी आळंदीत अनेक खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत. या संस्थांमध्ये कमीत कमी १० […]Read More

राजकीय

सरकारच्या मदतीने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू

अहिल्यानगर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्य नेतृत्वाने माझ्यावर महाराष्ट्राच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून माझा मोठा सन्मान केला अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत प्रदेश भाजपचे नूतन कार्याध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय तसेच प्रदेश नेतृत्वाला चव्हाण यांनी धन्यवाद दिले आहेत. नियुक्तीनंतर प्रथमच ते माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजप […]Read More

महिला

भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी बीडची प्रियंका इंगळे 

बीड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय महिला खो खो संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आलेली प्रियांका इंगळे ही बीड जिल्ह्यातील कळंब अंबा येथील आहे. ती इन्कम टॅक्स असिस्टंट मुंबई येथे कार्यरत आहे. तसेच क्रीडा अधिकारी म्हणून देखील परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाली असून दरम्यान खो खो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघामध्ये ती कर्णधार […]Read More