मुंबई, दि. १७ : राज्यातील चार किनारपट्टी जिल्ह्यांतील सात समुद्रकिनाऱ्यांची ‘ब्लू फ्लॅग’ (Blue Flag certification ) प्रमाणपत्रासाठी निवड करण्यात आली आहे. ही यादी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (MoEFCC) अधिपत्याखालील सेंटर फॉर एन्व्हायरन्मेंट एज्युकेशन (CEE) या राष्ट्रीय ऑपरेटरकडे पाठवण्यात आली आहे. या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेढा, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, निवटी आणि कर्दे, […]Read More
हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसार पोलिसांनी शनिवारी ज्योतीला न्यायालयात हजर केले, जिथे पोलिसांना ५ दिवसांची रिमांड मिळाली. हिसार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ‘ज्योती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होती. ती सोशल मीडियाद्वारे भारताची गोपनीय माहिती पाठवत होती. ज्योतीने चार वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे, ज्यामुळे ती भारतीय सुरक्षा एजन्सींच्या देखरेखीखाली […]Read More
हैदराबाद: (१७ मे) एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी सांगितले की, दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा दीर्घ इतिहास असलेला पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे. सरकार जागतिक राजधानींमध्ये पाठवत असलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांपैकी एकाचा सदस्य म्हणून हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय समुदायाला संदेशाचा केंद्रबिंदू असेल असे त्यांनी सांगितले. पीटीआय व्हिडिओजला दिलेल्या मुलाखतीत, हैदराबादचे खासदार म्हणाले की, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी दीर्घकाळापासून निष्पाप […]Read More
मुंबई, दि 17:मुस्लिम समाजातील पवित्र यात्रा मानल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी खासगी दूर ऑपरेटरना मंजूर केलेला ४२ हजार जणांचा कोटा रद्द करण्यात आल्याने हज यात्रेसाठी पैसे भरलेल्या भाविकांमध्ये नाराजी आहे. मात्र, यात्रेसाठी भरलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. संबंधित यात्रेकरूंना पुढील वर्षी होणाऱ्या हज यात्रेसाठी प्राधान्याने पाठविण्यात येईल, अशी ग्वाही संघटनेने दिली. ऑल इंडिया हज अॅण्ड उमराह […]Read More
मुंबई दि १७:– धार्मिक भेदभाव करत मुस्लीम विद्यार्थींना नागपुरातील ज्या ‘दयानंद आर्य कन्या विद्यालया’ने प्रवेश नाकारले, त्या संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांप्रती कोणताही धार्मिक भेदभाव करण्यात येऊ नये, अशी सक्त ताकीत राज्यातील सर्व शाळांना देण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात […]Read More
मुंबई दि १७ — पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावाजवळून वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी वैतरणा नदीची उपनदी असलेल्या देहरजी नदीवर हा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत माती व दगडांचा वापर करून धरण बांधण्यात येत असून या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यापैकी ९३.२२ दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारण […]Read More
मुंबई, दि 17स्त्रीशक्तीच्या प्रखरतेचा नवा अध्याय उलगडणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कश्मीरा कुलकर्णी हिच्या दमदार अभिनयाने सजलेला हा टीझर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिचा आक्रोश आणि सन्मानासाठीचा संघर्ष मांडतो. एका विवाहित स्त्रीचा तिच्या पतीच्या अत्याचाराविरोधातील लढा, तिच्या स्वाभिमानाची लढाई आणि त्या संघर्षातून निर्माण झालेला तिचा आत्मविश्वास हे सारं […]Read More
मुंबई, दि 17बकरी ईद २०२५ सणाच्या निमित्ताने धार्मिक पशुवधाच्या परवानगीसाठी अर्ज करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यंदा MyBMC अॅप्लिकेशनवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच धार्मिक पशुवधासाठी म्हैसवर्गीय प्राणी व बकरे आयात परवाना तसेच ‘स्लॉट बुकिंग’साठी https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, देवनार पशुवधगृह येथे पशु बाजार तसेच धार्मिक पशुवधासाठी विविध […]Read More
मुंबई दि १७– विलेपार्ले (पूर्व) येथे जैन समाजाच्या श्रद्धास्थळी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या शेडच्या उभारणीस न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा निर्णय संबंधित प्रकरणात एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, तो श्रद्धा आणि कायदेशीर मार्गाने चाललेल्या संघर्षाला दिलासा देणारा ठरला आहे. या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या K/ईस्ट विभागामार्फत शेडच्या उभारणीसाठी तातडीने काम सुरू करण्यात आले आहे. […]Read More
मुंबई, दि 17उच्च रक्तदाब हा जीवनशैलीशी निगडित आजार आहे. उच्च रक्तदाब ‘सायलेंट किलर’ म्हणूनही ओळखला जातो. उच्च रक्तदाब शरीराला हळूहळू हानी पोहोचवतो. परंतु योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केला, तर उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते. जागतिक रक्तदाब दिन १७ मे २०२५ साठी यंदाचे घोषवाक्य ‘रक्तदाब अचूक मोजा, नियंत्रणात ठेवा आणि दीर्घायू व्हा’ हे आहे.उच्च रक्तदाब […]Read More