mmcnews mmcnews

राजकीय

पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय

मुंबई दि २० — आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले असून आता पालघर जिल्ह्याला MH-60 ही नवीन परिवहन ओळख मिळाली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, ९ एप्रिल रोजी संपर्कमंत्री या नात्याने पालघर येथे झालेल्या लोकदरबारामध्ये लवकरच पालघर मधील नागरिकांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय […]Read More

राजकीय

‘माझे घर, माझा अधिकार’ राज्याचे गृहनिर्माण धोरण, ३५ लाख घरांच्या

मुंबई, दि. २० : राज्याच्या गृहनिर्माण धोरण 2025 ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ‘माझे घर, माझा अधिकार’ हे ब्रीद अनुसरून वर्ष 2030 पर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल घराचे अभिवचन देणाऱ्या राज्याच्या गृह निर्माण धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या […]Read More

ट्रेण्डिंग

NCERT ची 2.5 कोटींची पायरेटेड पुस्तके जप्त

नवी दिल्ली, दि. २० : दिल्ली पोलिसांनी काल एनसीईआरटी चा १.७ लाखांहून अधिक पायरसी केलेली पाठ्यपुस्तके जप्त केली. त्याची किंमत २.४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे, ज्यात एका पिता-पुत्राचा समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींची ओळख प्रशांत गुप्ता (४८) आणि त्यांचा मुलगा निशांत गुप्ता (२६) आणि अरविंद […]Read More

ट्रेण्डिंग

अमेरिकेत विमानतळावर अडकले भारतातून पाठवलेले ४ कोटी रुपयांचे आंबे

भारतीय आंबा निर्यातदारांना मोठा धक्का बसला आहे, कारण अमेरिकेने १५ आंबा शिपमेंट्स परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को आणि अटलांटा येथील विमानतळांवर ही शिपमेंट्स अडवण्यात आली असून, एकूण ₹४.२ कोटींचे नुकसान झाले आहे. परत पाठवण्याचा खर्च जास्त असल्याने निर्यातदारांनी आंबे अमेरिकेतच नष्ट करण्याचा निर्णय घेतला. निर्यातदारांनी आरोप केला आहे की ही चूक […]Read More

देश विदेश

भारत-पाक सीमेवर आजपासून ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळा पुन्हा सुरु

भारत आणि पाकमधील वाढत्या तणावामुळे ७ मे पासून स्थगित करण्यात आलेला ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळा सीमा सुरक्षा दल (BSF) आजपासून पुन्हा सुरू करणार आहे. हा परेड सोहळा अटारी-वाघा, हुसैनीवाला (फिरोजपूर) आणि सदकी बॉर्डर (फाजिल्का) येथे आयोजित केला जातो, जे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर दैनंदिन सांस्कृतिक आणि लष्करी शौर्याचे प्रतीक बनले आहेत. बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समारंभ […]Read More

महानगर

रमाबाई नगर पुनर्विकासासाठी एमएमआरडीएला १५०० कोटींचे कर्ज

रमाबाई नगर पुनर्विकासासाठी एमएमआरडीएला १५०० कोटींचे कर्ज मुंबई दि २० — मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) समावेशक गृहनिर्माण आणि शाश्वत नागरी पायाभूत सुविधांसाठीच्या आपल्या प्रयत्नांना मोठे यश मिळवले आहे. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर पुनर्विकासासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून ₹१५०० कोटींचा कर्जपुरवठा मिळवण्यात आला आहे. हा एमएमआरडीएचा पहिलाच थेट झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प […]Read More

राजकीय

माथाडी कामगारांच्या आंदोलन जल्लोषात.

मुंबई, दि 20:-विविध माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या राज्य स्तरावरील धोरणात्मक प्रश्नासंदर्भात राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचेसमोर संबंधितांची माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समितीबरोबर संयुक्त बैठक लावण्याचा प्रयत्न करण्याचे आणि माथाडी कामगारांचे माथाडी मंडळाच्या अखता-यातील दैनंदिन प्रलंबित प्रश्न संबंधित माथाडी मंडळाकडे सादर केल्यानंतर त्याची एक महिन्याच्या आंत सोडवणुक करण्याचा व माथाडी बोर्डाच्या अधिका-यांची […]Read More

पर्यटन

शिवभक्ताने घडविले सत्तरीतल्या शिवप्रेमींना रायगड दर्शन

मुंबई प्रतिनिधी : रायगड समजावून घ्यावा तो राजू देसाई यांच्या कडूनच, अशा शब्दांत सत्तरीतल्या शिवप्रेमींनी शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांच्या कार्याचा गौरव केला. मल्ल्या-वराडकर फ्रेंड्स क्लबच्या ६० ते ८० वयोगटातील ज्येष्ठ सभासदांनी रायगड अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांच्यासोबत किल्ले रायगड भ्रमंती केली. भर उन्हात असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी राजू देसाई यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज […]Read More

ऍग्रो

शेतमाल वाहून गेलेल्या शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांचा फोन

वाशीम दि २०:– वाशीम जिल्ह्यातील मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी गौरव पवार यांचं भुईमुगाचं पीक संपूर्णपणे वाहून गेलं. या संकटसमयी पीक वाचवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र काही क्षणांतच संपूर्ण माल पावसाच्या प्रवाहात गेला. गौरव पवार यांच्या या प्रयत्नांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. […]Read More

मराठवाडा

शेतकऱ्याने ठरवलं आणि सेंद्रिय शेतीत केशर आंबा बहरला…

जालना दि २० : (अनंत साळी)जालना तालुक्यातील कडवंची आणि मंदापूर या गावांची ओळख मराठवाड्यातील द्राक्षाचे हब म्हणून झालेली. परंतु गेल्या 3/4 वर्षात पाण्याची कमतरता,अवकाळी मुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले.कित्येकांनी द्राक्षांच्या बागांवर रोटाव्हेटर फिरवले,कित्येकांनी कुऱ्हाडीने द्राक्षांचे वेल तोडून टाकले. नंदापूर येथील वनस्पती शास्त्रात M.sc झालेल्या भरत उबाळे यांच्या वडिलांचं वय झालेलं असल्याने पारंपरिक शेतीची […]Read More