नवी दिल्ली, दि. २३ : देशातील कोट्यवधी WhatsApp युजर्ससाठी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्यानंतर आता स्पर्धा आयोगाने (CCI) दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यास WhatsApp सहमती दर्शवली आहे. म्हणजेच, आता युजर्सना त्यांचा वैयक्तिक डेटा इतर मेटा (Meta) प्लॅटफॉर्म (इंस्टाग्राम, फेसबुक) वर शेअर करायचा की नाही याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. WhatsApp आणि मेटा Meta यापूर्वी या आदेशाविरोधात […]Read More
बीड, दि. २३ : मंडप उभारून १० वीची परीक्षा घेणं बीडमधील केंद्रप्रमुखांना चांगलं भोवल आहे. शिक्षण विभागानं केंद्रप्रमुखांचं निलंबन केल आहे. कुर्ला या ठिकाणी यशवंत विद्यालयात जागे अभावी आणि अचानक विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे कारण देत केंद्रप्रमुखानं थेट शाळेच्या टेरेसवर मंडप उभारून विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने कारवाईचे आदेश दिले. […]Read More
मुंबई, दि. 23 : दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील फेब्रुवारी महिन्यातील अवकाळा पावसाने राज्याच्या विविध भागांमध्ये हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातल्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. लातूरमध्ये विजेच्या कडकडाटासह गारपिटही झाली. बीडमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागाने 23 आणि 24 […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीवर मनाई कायम ठेवली आहे. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यानुसार राज्यातील ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास […]Read More
नवी दिल्ली,दि. २१ : काश्मीरमध्ये पहलगाम येथे पाकिस्तानने पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले होते. या ऑपरेशन अंतर्गत विशेष कामगिरी केल्याबद्दल सोलापूरचे सुपुत्र सुशील गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयातील ऑपरेशन आणि लॉजिस्टिक्स संचालनालयात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुशील गायकवाडांना भारतीय लष्कर प्रमुखांचे […]Read More
मुंबई, दि. 21 : सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने निवडक जागतिक वारसा किल्ल्यांसाठी जतन-संवर्धन आणि पर्यटकांना सोयी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारसा सुरक्षित राहण्याबरोबरच पर्यटनालाही चालना मिळणार आहे. राजगड, सांदेरी, साल्हेरछत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची पहिली राजधानी मानला जाणारा राजगड किल्ला सध्या संवर्धनाच्या मोठ्या टप्प्यात आहे. येथे 4.91 […]Read More
नवी दिल्ली, दि. 21 : नुकत्याच झालेल्या जागतिक AI परिषदेत गलगोटीया विद्यापीठाने चिनी बनावटीचा रोबो कुत्रा सादर केल्यानंतर जगभर भारताच्या AI मधील कामगिरीबद्दल शंका घेतल्या जाऊ लागल्या. या घटनेमुळे या परिषदेत आपल्या अनोख्या AI उत्पादनांसह सहभागी झालेल्या नवोदीत भारतीय संशोधकांच्या कामगिरीकडे माध्यमांचे दुर्लक्ष झाले. मात्र भारतही AI मध्ये उत्तम कामगिरी करत असल्याची ग्वाही आज समोर […]Read More
मुंबई, दि. 21 : काही महिन्यांपासून बंद असलेली मुंबई मोनोरेल आता अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज होऊन पुन्हा धावू लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नवीन रेक आणि सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीला मान्यता मिळाल्याची माहिती दिली. ही सुरक्षा मान्यता ‘ब्युरो व्हेरिटास’ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून देण्यात आली आहे. चेंबूर ते जेकब सर्कल या १९.५४ किमी मार्गावरील सेवा […]Read More
मुंबई, दि. २१ : शिमग्यासाठी कोकणातील गावी जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आता अजून एक नवा वाहतूक पर्याय सुरू होत आहे. मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा १ मार्चपासून सुरू होत आहे. समुद्रमार्गे प्रवासी आणि वाहनांसह प्रवास करण्याची सुविधा मिळणार असल्याने कोकणात जाणं अधिक सोपं होणार आहे. या सेवेचा शुभारंभ सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पहिले तिकीट बुक करून […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ : दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय AI परिषदेत नोएडातील गलगोटीया या खाजगी विद्यापीठाने चीनी बनावटीचा रोबो कुत्रा आपणच तयार केल्याची मल्लीनाथी केल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यापीठाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली तरी जगभर यामुळे भारताची बदनामी झाली आहे. त्यामुळे देशभरातील खाजगी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालक चिंतीत झाले आहेत. […]Read More