mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकर अपघातप्रकरणी कृती आराखडा

मुंबई दि २८ : घातक रसायने आणि ज्वलनशील वायू वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात झाल्यास त्यापासून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी एक व्यापक कृती आराखडा तयार करण्यात यावा अशा सूचना सर्व संबंधित उत्पादक कंपन्यांना देण्यात येत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या प्रेेपोलिन गॅस टँकरच्या अपघातामुळे तब्बल ३६ तास ठप्प […]Read More

मराठवाडा

अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानाला १ कोटींची निनावी देणगी

अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानाला १ कोटींची निनावी देणगीबीड दि २८ …बीडच्या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरासाठी एका मुंबईतील भक्ताने तब्बल एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मंदिराच्या शंभर वर्षे जुन्या शिखराच्या जिर्णोद्धारासाठी ही रक्कम देण्यात आली असून, विशेष म्हणजे संबंधित देणगीदाराने आपले नाव गुप्त ठेवण्याची अट घातली आहे.   महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीच्या मंदिराचे […]Read More

अर्थ

इस्रायल-इराण युद्धाचा भडका आणि भारताचा जीडीपी; ‘ब्लॅक मंडे’ की सावरण्याची

जितेश सावंत भारतीय शेअर बाजारासाठी मागील आठवडा हा केवळ संघर्षाचाच नव्हता, तर येणाऱ्या एका मोठ्या जागतिक वादळाची नांदी देणारा ठरला आहे. गेल्या आठवड्याची सुरुवात अमेरिका-इराण तणावाने झाली, ज्याचे रूपांतर आता थेट युद्धात झाले आहे. आयटी (IT) क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली मोठी घसरण आणि जागतिक नफेखोरीमुळे गुंतवणूकदारांचे कंबरडे आधीच मोडले असताना, आज शनिवारी आलेल्या बातम्यांनी […]Read More

ऍग्रो

कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबई दि. २८ : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत कापूस खरेदीची मुदत 15 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. या निर्णयासोबतच हमीभावाने हरभरा खरेदी प्रक्रिया 1 मार्च 2026 पासून सुरू होणार असल्याचेही रावल यांनी सांगितले. राज्यात कापूस खरेदीची मुदत वाढवावी, […]Read More

मराठवाडा

पुढील वर्षभर जामीनासाठी अर्ज करू नका, सर्वोच्च न्यायालयाने बजावले वाल्मीक

नवी दिल्ली, दि. २६ : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याला आज सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. वाल्मीक कराड हा बीड कारागृहात असून त्याने हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत त्याला […]Read More

महानगर

सरकारनेच थकवले शिक्षण विभागाचे रु ७२४१.३८ कोटी अनुदान

मुंबई, दि. 26 : मुंबई मनपाच्या शाळांच्या खर्चासाठी राज्य सरकार अनुदान देते. मात्र सरकारने शिक्षण विभागाचे तब्बल ७२४१.३८ कोटी रुपये थकविले आहेत. ही रक्कम मिळविण्यासाठी महापालिका प्रशासन राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करत आहे. मात्र आजही महापालिका अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकारकडून मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणासाठी आणि शाळातील कर्मचारी वर्गाच्या वेतनासाठी ७२४१.३८ कोटी इतकी रक्कम येणे […]Read More

ट्रेण्डिंग

अविमुक्तेश्वरानंदांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

अलाहाबाद, दि. २६ : अल्पवयीन शिष्यांचं लैंगिक शोषण प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. पीडित अल्पवयीन मुलांच्या वैद्यकीय अहवालात मुलांचं लैंगिक शोषण झाल्याची पुष्टी झाली आहे. बुधवारी पोलिसांनी पीडित दोन्ही मुलांची वैद्यकीय चाचणी केली होती. तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी यांनी मुलांचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला होता. दरम्यान स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अलाहाबाद उच्च […]Read More

देश विदेश

सिम कार्डशिवाय चालणार नाही WhatsApp

नवी दिल्ली, दि. २६ : केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की ‘सिम बाइंडिंग’चे नियम लागू करण्याची २८ फेब्रुवारीची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. नवीन नियमांनुसार फोनमध्ये सिम कार्ड नसल्यास व्हॉट्सॲपसारखे मेसेजिंग ॲप काम करणार नाहीत. कॉम्प्युटरवर लॉगिन केलेले व्हॉट्सॲप देखील ६ तासांत लॉग-आउट होईल. ॲपला सिम बाइंडिंगशी जोडल्यावर ते ॲप तेव्हाच उघडेल जेव्हा तुमचे नोंदणीकृत […]Read More

ट्रेण्डिंग

इस्रायलमध्ये लागू होणार भारतीय UPI

नवी दिल्ली, दि. २६ : UPI च्या वापरामुळे भारतीय आर्थिक व्यवहारांमध्ये सुटसुटीतपणा आणि तत्परता आल्यानंतर आता इतर देशही या पद्धतीचा स्वीकार करू लागले आहेत. पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यात दरम्यान भारताची UPI पेमेंट सिस्टीम आता इस्रायलमध्ये लागू केली जाईल, असा निर्णय मोदी आणि इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबत संयुक्त […]Read More

देश विदेश

‘ई-२०’ इथेनॉलची विक्री १ एप्रिलपासून बंधनकारक

नवी दिल्ली, दि. २६ : केंद्र सरकारने येत्या १ एप्रिलपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रित (ई-२०) आणि किमान रिसर्च ऑक्टेन नंबर (आरओएन) ९५ असलेल्या पेट्रोलची विक्री बंधनकारक केली आहे. तेल मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘केंद्र सरकार यानुसार निर्देश देते की, तेल कंपन्यांनी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस’च्या मानकांनुसार २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल […]Read More