mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

ठाणे जिल्हातील ११२ पर्यटक नेपाळच्या दंगलीत अडकले ..

ठाणे दि १०:– नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर बंदी आणली आणि त्याविरोधात हजारो युवकांनी जोरदार आंदोलन केलं. काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरले आणि या आंदोलनला हिंसक वळण लागलं नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर झाली असून ठाणे जिल्हातील मुरबाड तालुक्यातील ११२ पर्यटक नेपाळमध्ये सुरु असलेल्या दंगलीत अडकून पडल्याची माहिती मुरबाडचे आमदार किशन कथोरे यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील […]Read More

राजकीय

स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून न्यायालयाकडून सरकारची कानउघाडणी

मुंबई, दि. १० : नागरिकांकडून स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून लाखो रुपये वसूल करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. तुम्ही नागरिकांवर अन्याय करुन त्यांच्या पैशांवर स्वतःची तिजोरी भरू शकत नाही. जनतेच्या पैशांवर स्वतःला समद्ध करू नका, अशा शब्दांत न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी राज्य सरकारची कानउघाडणी करताना एका कंपनीला अयशस्वी मालमत्ता व्यवहारासाठी ६० लाख रुपये स्टॅम्प […]Read More

ट्रेण्डिंग

मालेगाव बॉम्बस्फोट निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

मुंबई, दि. 10 : मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात सहा नागरिकांचा मृत्यू झाला आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य पाच आरोपींची निर्दोष सुटका केली होती. मात्र, या निर्णयाला आता बॉम्बस्फोटात बळी पडलेल्या पीडितांच्या […]Read More

देश विदेश

नेपाळनंतर आता फ्रान्समध्ये देखील सरकार विरोधात निदर्शने

पॅरिस, दि. 10 : नेपाळमध्ये सरकारविरोधात झालेल्या आंदोलनानंतर आता फ्रान्समध्येही जनतेचा रोष उफाळून आला आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या धोरणांविरोधात नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, देशभरात असंतोषाची भावना तीव्र झाली आहे. पॅरिससह अनेक शहरांमध्ये निदर्शकांनी जाळपोळ, दगडफेक आणि वाहतूक अडथळे निर्माण केले आहेत. ‘ब्लॉक एव्हरीथिंग’ या ऑनलाइन मोहिमेच्या माध्यमातून आंदोलनाची सुरुवात झाली आणि त्यानंतर […]Read More

महाराष्ट्र

हैदराबाद गॅझेट जीआरबाबत सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल

मुंबई, दि. १० : मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानंतर कायदेशीर हालचालींना वेग आला आहे. या निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटिअरमधील ऐतिहासिक नोंदींचा आधार घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, या निर्णयाला काही संघटनांनी आणि व्यक्तींनी न्यायालयात आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर बीड […]Read More

देश विदेश

तेजस्वी मनोज ठरली TIME ‘किड ऑफ द इयर’ – जाणून

अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणारी भारतीय वंशाची तेजस्वी मनोज हिला TIME मासिकाने 2025 साठी ‘किड ऑफ द इयर’ म्हणून गौरवले आहे. वयाच्या केवळ 17व्या वर्षी तिने समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे तिला ही प्रतिष्ठित उपाधी मिळाली आहे. तिची कामगिरी केवळ प्रेरणादायकच नाही, तर डिजिटल युगात समाजसेवेचा नवा आदर्श ठरली आहे. तेजस्वीने ‘Shield Seniors’ नावाचा एक डिजिटल प्रकल्प तयार […]Read More

ट्रेण्डिंग

उ.प्रदेशातील विद्यार्थ्यांना येतो हिंदीच्या पेपरचा मोठा ताण

लखनौ, दि. १० : उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2026 पासून इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांमध्ये हिंदी विषयाचा पेपर पहिल्या दिवशी घेतला जाणार नाही. या निर्णयामागील मुख्य कारण म्हणजे हिंदी विषयामुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताण. हिंदी हा स्कोरिंग विषय असूनही, पहिल्या दिवशी परीक्षा असल्यामुळे अनेक […]Read More

पर्यावरण

No PUC… No Fuel नियमाची होणार कठोर अंमलबजावणी

मुंबई,दि. १० : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “No PUC… No Fuel” या उपक्रमाची राज्यभरात कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. याचा उद्देश म्हणजे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) नसलेल्या वाहनांना इंधन न देणे, जेणेकरून पर्यावरण प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल.ही योजना भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या उपक्रमाचे मुख्य मुद्दे:प्रत्येक पेट्रोल पंपावर […]Read More

राजकीय

‘महाराष्ट्रातील राज्यपाल पदाचा कार्यकाळ सर्वात आनंददायी ’

(उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते , मंत्रिमंडळातील सदस्य तसेच निवडक विधानमंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत दिनांक २५ ऑगस्ट रोजी राजभवन येथे एका अनौपचारिक कार्यक्रमात सत्कार करण्यात आला होता. यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी केलेल्या भाषणातील निवडक अंश.) महाराष्ट्रात १३ महिने सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. या काळात मला […]Read More

मराठवाडा

समृद्धी महामार्गावर ठोकलेल्या खिळ्यानी असंख्य वाहने झाली पंक्चर….

छ. संभाजी नगर दि १०– समृद्धी महामार्गावरील पहिल्या आणि दुसऱ्या मार्गिकांवर १५ मीटर जागेवर सूक्ष्म तडे गेले होते. त्यामुळे या भागाच्या दुरुस्तीसाठी एमएसआरडीसीच्या कर्मचाऱ्यांनी नोजल्स (लोखंडी खिळ्याप्रमाणे दिसणारे उपकरण) ठोकले होते. या कामादरम्यान वाहतूक वळविण्यात आली होती. मात्र काही वाहने काम सुरू असलेल्या आणि खिळे लावण्यात आलेल्या मार्गिकेवरून जाऊ नये असे बोर्डच लावले न गेल्याने […]Read More