Month: March 2026

कोकण

लोटे MIDC तील कंपनीत भीषण स्फोट; ९ कामगार होरपळले…0PP

रत्नागिरी दि ६ : खेड लोटे MIDC मधील डॉक्टर खान कंपनीत दोन मोठे स्फोट झाले. दुपारी २.४५ च्या दरम्यान ही घटना घडली. स्फोटा नंतर परिसरात मोठा आवाज होऊन हादरे बसले. या अपघातात कंपनीतील ९ कामगार जखमी झाले आहेत. यातील ४ कामगार गंभीररीत्या होरपळले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. तर इतर ५ जणांची प्रकृती स्थिर आहे. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

बार्टीच्या निबंधक पदाचा डॉ. सुचिता शिंदे यांनी स्वीकारला पदभार

पुणे, दि ६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे संस्थेच्या निबंधक पदाचा पदभार छत्रपती संभाजीनगर भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता वसंतराव शिंदे यांनी गुरुवार, दिनांक ५ मार्च २०२६ रोजी स्वीकारला.बार्टी, पुणे मुख्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुध्द (बुध्दरूप) यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी १० मार्चला पुण्यात राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन

पुणे, दि ६: गया (बिहार) येथील ऐतिहासिक ‘महाबोधी महाविहाराचे’ व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध धम्मियांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी पुणे परिसरातील भिक्खू संघातर्फे राष्ट्रव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर), पुणे येथे पार पडणार आहे. अशी  माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात […]Read More

मनोरंजन

बिग बॉस मराठीच्या घरात ‘भूल भुलैय्या’चा गोंधळ.

मुंबई, दि ६बिग बॉस मराठीच्या घरात येणाऱ्या भागात प्रेक्षकांना एक भन्नाट आणि वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य वेगवेगळ्या हटके पात्रांच्या अवतारात दिसत असून घरात अक्षरशः ‘भूल भुलैय्या’सारखी मजेशीर धमाल रंगताना दिसते. या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला एक खास पात्र दिलं गेलं आहे. त्यामुळे घरातील वातावरण काही काळासाठी पूर्णपणे बदललेलं दिसतं. […]Read More

राजकीय

मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना मिळणार विक्रीच्या जागा

मुंबई दि ६ : मुंबईत २०१४ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पात्र असलेल्या फेरीवाल्याना यासंदर्भात सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन बाबींचा निर्णय येईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिले, यावर त्याचं अनुपालन करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या जातील असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. २०१४ च्या सर्वेक्षणात […]Read More

राजकीय

राज्य सरकार देणार निवृत्त अग्निविरांसाठी रोजगाराच्या संधी ….

मुंबई दि ६ : राज्यातून अकरा हजार तरुण देशाच्या सैन्यदलात अग्निविरांच्या रूपाने निवडले गेले आहेत त्यातील पंचवीस टक्के चार वर्षानंतर केंद्र सरकारच्या विविध विभागात सामावून घेतले जातील उर्वरित तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता एक अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे, त्याचा अहवाल पुढील महिन्यात आल्यावर त्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती माजी सैनिक कल्याण मंत्री […]Read More

महानगर

कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू,

मुंबई, दि ५नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 2, प्लॉट नंबर 12 येथील विद्या भवन सोसायटीमध्ये गुरुवारी सायंकाळी सुमारे 5.20 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. तळमजल्यावर घरगुती क्लास सुरू असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळला.घटनेची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य हाती घेत मलब्याखाली अडकलेल्या […]Read More

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 नगरसेवकांचे पद धोक्यात

छत्रपती संभाजीनगर, दि. ५ : शहरातील अतिक्रमण विरोधी मोहिमेत अडथळा आणल्याच्या कारणावरून MIM च्या 14 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी या कारवाईबाबत अधिकृत दुजोरा दिला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे […]Read More

ट्रेण्डिंग

इराण युद्धामुळे भारतीय कृषी उत्पादन निर्यातीला मोठा फटका

मुंबई, दि. ५ : इराणमधील युद्धपरिस्थितीचा थेट परिणाम भारतीय कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर होत आहे. विशेषतः चहा, महाराष्ट्रातील हळद आणि बासमती तांदळाची निर्यात जवळजवळ ठप्प झाली आहे. मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे जहाजवाहतूक मार्गांवर अडथळे निर्माण झाले असून निर्यातदारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. हजारो टन हळद मुंबईच्या जेएनपीटी बंदरात अडकल्याची मोठी बातमी समोर आली आहे.यामुळे सांगलीच्या […]Read More